टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणाऱ्या भारतीय महिला संघाची निराशाजनक सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार लेनिंगने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर एलिसा हेलीने सुरुवातीच्या षटकापासून फटकेबाजी करत भारतीय महिलांवर दडपण आणलं.

अवश्य वाचा – तुमच्यासाठी कायपण ! बायकोच्या अंतिम सामन्यासाठी मिचेल स्टार्कने अर्ध्यावर सोडला आफ्रिका दौरा

मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत हेलीने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावलं. महत्वाची गोष्ट म्हणजे हेलीचं हे अर्धशतक, आयसीसीच्या स्पर्धेच्या (पुरुष आणि महिला) अंतिम फेरीतलं सर्वात जलद अर्धशतक ठरलं.

पहिल्या विकेटसाठी एलिसा हेली आणि बेथ मुनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. अखेरीस राधा यादवने हेलीला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा पटकावल्या.