News Flash

अमेरिकेला आणखी तीन सुवर्णपदके

नियाने विश्वविक्रमवीर केनी हॅरिसनला मात देत १२.४३ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले.

निया अली

दोहा : अडथळा शर्यतीतील धावपटू निया अली हिने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेला अखेरचे सुवर्णपदक मिळवून दिले. अखेरच्या दिवशी अमेरिकेने तीन सुवर्णपदकांची कमाई केली. अमेरिकेने १४ सुवर्ण, ११ रौप्य व चार कांस्यपदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

नियाने विश्वविक्रमवीर केनी हॅरिसनला मात देत १२.४३ सेकंदांसह सुवर्णपदक जिंकले. ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत अमेरिकेच्या पुरुष आणि महिला संघाने सुवर्णपदक पटकावले. फ्रेड केरले, मायकेल चेरी, विल लंडन आणि राय बेंजामिन यांच्या पुरुष संघाने २.२६.६९ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदकावर नाव कोरले. फिलिस फ्रान्सिस, सिडनी मॅकलाफलिन, डलिया मुहम्मद व व्ॉडलिन जोनाथस यांच्या अमेरिका महिला संघाने ३.१८.९२ सेकंदांसह अग्रस्थान प्राप्त केले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 4:18 am

Web Title: world athletics championship three more gold medals to us zws 70
Next Stories
1 महान क्रिकेटपटू ते दहशतवाद्यांच्या हातातलं बाहुलं; कैफने काढले इम्रान खानच्या अब्रुचे धिंडवडे
2 दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल
3 लोकं काय विचार करतील याची मला चिंता नाही – रोहित शर्मा
Just Now!
X