टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहेच. पण त्याच बरोबर रोहितने बांगलादेश विरुद्ध डावातील दुसरा षटकार लगावून एक नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे.

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या एमएस धोनीला मागे टाकले. धोनीच्या नावावर ३५८ षटकार आहेत. बांगलादेश विरुद्ध दुसरा षटकार ठोकताच रोहितने धोनीला मागे टाकले.

याच सामन्यात चौथा षटकार मारल्यानंतर रोहित वनडे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार लगावणारा क्रिकेटपटू बनला. रोहितचे वनडे क्रिकेटमध्ये २२९ षटकार झाले आहेत. धोनीच्या नावावर २२८ षटकार आहेत.

धोनीने आज १०४ धावांच्या खेळीत बांगलादेशच्या गोलंदाजांची पिसे काढली. शतकी खेळीत रोहितने सात चौकार आणि पाच षटकार लगावले. काच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तर एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या विक्रमाची बरोबर केली आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे आहे.