पाच कसोटी सामन्यांच्या अ‍ॅशेसचे आणि भारत-बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत समान महत्त्व कसे असू शकते. त्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पध्रेची गुणपद्धती आक्षेपार्ह आहे, अशी टीका इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केली आहे.

साऊदम्पटन येथील एजेस बाऊल मैदानावर १८ ते २२ जून या कालावधीत भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रत्येक मालिकेला समान गुणांचे वाटप केले आहे. त्यामुळे जे संघ कमी सामने खेळतात, त्यांच्या गुणसंख्येवर फारसा परिणाम होत नाही.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

‘‘जागतिक कसोटी अजिंक्यपद ही अत्यंत प्रशंसनीय संकल्पना आहे. हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे त्याच्या अंमलबजावणीत समस्या आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील मालिकेचे भारत-बांगलादेश मालिकेइतकेच महत्त्व असणे अयोग्य आहे,’’ असे ब्रॉडने सांगितले.

‘‘जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणपद्धतीनुसार, मालिकेचे निकाल नव्हे, तर सामन्यांचे निकाल ग्रा धरले जातात. म्हणजेच पाच सामन्यांच्या मालिकेसाठी प्रत्येक सामन्यासाठी २० टक्के गुण मिळतात, तर दोन सामन्यांच्या मालिकेत प्रत्येक सामन्यासाठी ५० टक्के गुण मिळतात,’’ असे विश्लेषण ब्रॉडने केले.

जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत इंग्लंडचा संघ सर्वाधिक २१ सामने खेळला, तर त्यानंतर भारत १७ सामने खेळला. परंतु तळाच्या स्थानावरील बांगलादेशचा संघ्ज्ञ फक्त सात सामनेच खेळला. ‘‘आमचा संघ अधिक सामने खेळल्यामुळे सध्याच्या गुण पद्धतीनुसार अंतिम फेरी गाठणे कठीण झाले,’’ असे ब्रॉडने सांगितले. भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अंतिम फेरी गाठली. पण इंग्लंडला मात्र चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.