News Flash

नूरकडून पराभवामुळे जोश्नाचे आव्हान संपुष्टात

अग्रमानांकित नूर ईल शेर्बिनीने तिचा सरळ गेममध्ये पराभव केला.

 

जागतिक महिला स्क्वॉश स्पर्धा पीटीआय, कैरो

भारताचा आघाडीची स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाचे जागतिक महिला अजिंक्यपद स्पध्रेत आव्हान संपुष्टात आले आहे. अग्रमानांकित नूर ईल शेर्बिनीने तिचा सरळ गेममध्ये पराभव केला.

सोमवारी रात्री झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इजिप्तच्या नूरने जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानावर असलेल्या जोश्नाला ११-५, ११-३, ११-६ असे नामोहरम केले. तीन वेळा विश्वविजेत्या नूरच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीपुढे जोश्नाचा निभाव लागला नाही. जोश्नाने सलग दुसऱ्या सामन्यात नूरकडून पराभव पत्करला. याआधी २०१७ मध्ये झालेल्या चीन खुल्या स्क्वॉश स्पध्रेत नूरने जोश्नाला ३-१ असे हरवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2019 2:36 am

Web Title: world womens squash competition akp 94
Next Stories
1 फेडररचे १०वे विजेतेपद
2 शिवा थापासह सात जणांची उपांत्य फेरीत धडक
3 सात्त्विक-चिराग यांना उपविजेतेपद
Just Now!
X