भारताचा अव्वल कु स्तीपटू बजरंग पुनिया याने नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक कुस्ती क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र रँकिंग गुण मिळवणाऱ्या स्पर्धामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला तरी पुढील वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकपर्यंत बजरंग ६५ किलो वजनी गटात चौथ्या क्रमांकावर असेल, याची खात्री त्याला वाटत आहे.

पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल चार जणांसह स्थान मिळवू, असा विश्वास उभरता कुस्तीपटू रवी दहिया यालाही वाटत आहे. दहिया सध्या ५७ किलो गटात चौथ्या स्थानी आहे. रशियाचा ऑलिम्पिक विजेता गाझीमुराद राशीदोव्ह सध्या ६५ किलो गटात चार गुणांच्या फरकाने अव्वल स्थानी आहे. मात्र बजरंग आणि राशीदोव्ह यांनी या गटात आपले स्थान भक्कम के ले आहे. प्रत्येक गटातील अव्वल चार जणांना २०२१ ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.

बजरंग या वर्षांच्या सुरुवातीला २५ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. पण त्याने जागतिक स्पर्धेतील अंतिम फे री गाठणाऱ्या कझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोव्ह याला मागे टाकू न दुसरे स्थान पटकावले. जागतिक स्पर्धेत बजरंगने कांस्यपदकासह २५ गुणांची कमाई केली. त्यानंतर मॅटेओ पेलिकोन सीरिज स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून त्याने १६ गुण मिळवले.

५७ किलो गटात रशियाचा झौर उगेव्ह ६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. दहियाला मात्र अव्वल चार जणांमध्ये स्थान मिळवण्यासाठी शेवटच्या स्पर्धेत १२ गुणांची आवश्यकता आहे.