रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या संघाची कामगिरीशी फारशी चांगली झाली नाही. साखळी फेरीत केवळ १ विजय मिळवू शकलेल्या मुंबईचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सी.के.नायडू चषक स्पर्धेत मुंबईच्या संघाने आश्वासक कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आलेली असून या संघात १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालची निवड झालेली आहे. तसेच अर्जुन तेंडुलकरलाही संघात स्थान मिळालेलं आहे. याचसोबत मुंबईच्या संघाकडून रणजी हंगाम गाजवणाऱ्या सर्फराज खानलाही संघात स्थान मिळालं आहे. २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान पाँडेचरी संघाविरोधात हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

२३ वर्षाखालील मुंबईचा संघ पुढीलप्रमाणे –

हार्दिक तामोरे (कर्णधार), अमन खान, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, अग्नी चोप्रा, चिन्मय सुतार, गौरिश जाधव, वैभव कळमकर, श्रेयस गौरव, तनुष कोटीयन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अंजदीप लाड, प्रशांत सोलंकी, साईराज पाटील