News Flash

हरभजन सिंह नंतर युवराज सिंह झाला क्लिन बोल्ड

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

युवराज सिंह आणि हेजल किच

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री, मोडेल हेजल किचच्या प्रेमात युवराज क्लिन बोल्ड झाला. आयुष्यभराच्या पार्टनरशिपसाठी युवीने हेजलची निवड केली आहे. आणि गुपचूप साखरपूडादेखील केला. येत्या जानेवारीत दोघे विवाहाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे.
इंडोनेशियात बाली येथे बुधवारी दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. गेली अनेक दिवस माध्यमांमधून दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होत होती. हरभजन सिंगच्या लग्नात युवी व हेजल एकत्र आल्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचवल्या होत्या.
हेजल किच हिने सलमान खानच्या बॉडीगार्ड या चित्रपटात करिना कपूरची मैत्रीण आणि सलमान खानच्या पत्नीची भूमीका साकारली होती. तसेच बिग बॉस या रियालिटी शोच्या एका पर्वात ती सहभागी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 5:42 pm

Web Title: yuvraj singh gets engaged to girlfriend hazel keech reports
टॅग : Yuvraj Singh
Next Stories
1 युनुसची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
2 हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती
3 भारताची विजयाची प्रतीक्षा संपणार?
Just Now!
X