माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सुरूवातीला बेजबाबदार फटकेबाजी करणारा फलंदाज होता. माझ्या सल्ल्यानुसार त्याने खेळीत बदल केले आणि तो संयमी मॅच-फिनिशर म्हणून नावारूपाला आला, असा दावा भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी नुकताच एका भारतीय प्रसारमाध्यमाला मुलाखत देताना केला. त्या मुलाखतीत त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट यातला फरक, भारताचे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून वाट्याला आलेली कारकीर्द आणि त्यातील अनुभव तसेच कसोटी क्रिकेटचे भविष्य अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. पण धोनीच्या मुद्द्यावरून फिरकीपटू हरभजन सिंगनंतर आता माजी फलंदाज युवराज सिंग यानेही चॅपल यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“…त्यानंतर विराट परत माझ्या नादी लागला नाही”

चॅपेल यांच्या वक्तव्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विट करत त्यांच्यावर टीकस्त्र सोडले होते. “धोनीला मैदानालगतचे फटके खेळण्याचा सल्ला चॅपल यांनी या कारणासाठी दिला कारण त्यावेळी ते इतरांना मैदानाबाहेर उडण्याच्या प्रयत्नात होते. त्या काळात चॅपल यांचे काही निराळेच खेळ (संघातील राजकारण) सुरू होते. ग्रेग (चॅपल) यांच्या काळात भारतीय क्रिकेटने सर्वात घाणेरडे दिवस पाहिले”, असे ट्विट हरभजनने केले होते.

त्यांचे काही वेगळेच खेळ सुरू होते – हरभजन

त्याच ट्विटवर रिप्लाय देत युवराज सिंग याने चॅपल यांची खिल्ली उडवली. “एमएसडी (धोनी), युवी… शेवटच्या १० (षटकांमध्ये) षटकार मारायचे नाहीत हा… मैदानालगतचे फटके खेळा”, असे ट्विट करत त्याने हसण्याचा इमोजी टाकला.

धोनी नव्हे, ‘हा’ खेळाडू पुन्हा टीम इंडियात हवा; रोहितने व्यक्त केली इच्छा

काय म्हणाले होते चॅपल?

धोनी हा सुरुवातीला एक युवा खेळाडू म्हणून मैदानात उतरला, त्यावेळी तो फटकेबाज खेळी करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेपार व्हायला हवा असाच त्याचा फलंदाजी करताना मानस असायचा. पण त्यांच्यातील प्रतिभा ओळखून मी त्याला हवाई फटकेबाजी करण्याऐवजी मैदानी फटके खेळण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे तो एक यशस्वी मॅच-फिनिशर म्हणून नावारूपाला आला, असे ग्रेग चॅपल यांनी मुलाखतीत सांगितले.