भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. आता भारताची वेस्ट इंडिज विरूद्ध क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. ६ डिसेंबरपासून टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघाचे खेळाडू जोडीदारासोबत आणि कुटुंबीयांनासोबत वेळ घालवत आहेत.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत चित्रपट पाहिला. त्याबाबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर रोहित शर्माने सोमवारी पत्नी रितिकासोबत एक फोटो शेअर केला. तो फोटो पाहून युवराज सिंगची पत्नी हेझल किच हिने युवराजला थेट ‘रात्रीचं जेवण हवं असेल तर….’ अशा आशयाची कमेंट केली.
View this post on Instagram
Better than what was I before, more than what I’m today, is by holding that @ritssajdeh
रोहितने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या पत्नीचा हात हातात धरून भटकंती करत आहे. त्या फोटोवर रोहितने ‘मी या आधी आनंदी होतो, पण तुझा हातात हात घेतल्यानंतर माझा आनंद द्विगुणित झाला’, असे कॅप्शन लिहिले. रोहितच्या या पोस्टवर रितिकाने ‘Aaawwww babyyyyyyy’ अशी रोमॅन्टिक कमेंट केली. पण या दरम्यान, हेझल किचने मात्र तो फोटो पाहून युवराजला धमकी दिली. “युवराज, तू पण माझ्यासाठी असंच काहीतरी पोस्ट शेअर करायला पाहिजे. तुझं वागणं पाहून आपल्या लग्नाला ३० वर्ष झाल्यासारखं वाटतंय. बघू या आज रात्री तुला जेवण मिळतं की नाही ते…”, अशी मजेशीर धमकी हेजलने युवराजला दिली.
त्यानंतर, युवराजनेही लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या पत्नी हेजलला हटके शुभेच्छा दिल्या. युवीनं पोस्ट केली की,”लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा… असं वाटतंय की लग्नाला ३० वर्ष झालीत”, असं त्याने लिहिले.
View this post on Instagram
दरम्यान, युवराजने IPL 2019 च्या स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. IPL 2020 मध्ये त्याला कोणता संघ विकत घेतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
First Published on December 3, 2019 2:03 pm