05 July 2020

News Flash

‘ढिंच्यॅक पूजाला तुझी जोडीदार बनव…’; युझवेंद्र चहलला चाहत्याची कोपरखळी

क्रिकेट स्पर्धा रद्द असल्याने चहल सध्या टिक-टॉकवर अ‍ॅक्टिव्ह आहे

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

Video : भररस्त्यात चहलचे गाल ओढणारी ती तरूणी कोण?

करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत. या दरम्यान, भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मात्र सध्या वेगळ्याच विश्वात आहे. क्रिकेट स्पर्धा बंद असल्याने गेले काही दिवस चहल टिकटॉक वर बराच अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे.

भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. पण चहल मात्र आपल्या कुटुंबासोबत टिक-टॉक व्हिडीओ बनवताना दिसतो आहे. नुकतीच त्याने एक नवीन व्हिडीओ ट्विटरवरही शेअर केला आहे.

चहलचा वडिलांसोबत भन्नाट Tik Tok व्हिडीओ

मात्र या व्हिडीओवर त्याच्या फॅन्सने चांगलेच टोमणे मारले आहेत. काहींनी त्याला ‘आता पुरे कर’ असा खोचक सल्ला पण दिला आहे. तर काही लोकांनी चहल तुझी जोडी ढिंच्यॅक पूजासोबत छान दिसेल असेही सांगितले.

या आधीदेखील चहलने टिक-टॉकवरील व्हिडीओ शेअर केला होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 9:42 am

Web Title: yuzvendra chahal covid 19 instagram watch tiktok video viral amid coronavirus lockdown team india cricket ipl 2020 vjb 91
Next Stories
1 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रद्द
2 टीकाकारांनो, मला कमी लेखू नका!
3 बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत रद्द
Just Now!
X