हाँगकाँग येथे सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरी स्पर्धेत सौम्यजीत घोष आणि मनिका बत्रा यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावत रिओ ऑलिम्पिकवारी पक्की केली. दक्षिण आशियाई विभागाच्या पात्रता फेरीत अन्य देशांचे खेळाडू सहभागी झाले नसल्याने भारतीय टेबल टेनिसपटूंमध्येच मुकाबला रंगला. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या सौम्यजीतने गटवार लढतीत शरथ कमाल, अँथनी अमलराज आणि हरमीत देसाई यांनी नमवत आगेकूच केली. महिलांमध्ये मनिका बात्रा आणि के. शामिनी यांनी प्रत्येकी दोन लढती जिंकल्या होत्या. मात्र एकमेकींविरुद्धच्या लढतीत मनिकाने शामिनीवर विजय मिळवत बाजी मारली.