भारतीय संघाचा खेळाडू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सर्वोत्तम कामगिरी करुनही सलग दोनवेळा रायुडूला विश्वचषक संघात स्थान नाकारण्यात आलं. सर्वप्रथम संघ जाहीर करताना एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने विजय शंकरला पसंती दिली. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी रायुडूला जागा मिळेल अशी शक्यता होती, मात्र त्याजागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली. निवड समितीच्या याच निर्णयांवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने टीका केली आहे.

अवश्य वाचा – BLOG : अंबाती रायुडू, टीम इंडियाचा शापित गंधर्व !

गौतमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, थेट निवड समितीच्या सदस्यांच्या कारकिर्दीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. रायुडूसारख्या खेळाडूला न्याय न मिळणं ही शरमेची गोष्ट आहे, अशा शब्दांत गौतमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

गौतम गंभीरसोबत मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग यांनीही रायुडूच्या निवृत्तीच्या आणि संघात मयांक अग्रवालला संधी मिळण्याबाबतच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

अवश्य वाचा – जाणून घ्या, बीसीसीआयला लिहीलेल्या पत्रात काय म्हणाला रायुडू??