AB de Villiers’ sharp reply to Pakistani journalist: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पाकिस्तानने जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाज फझल्लाक फारुकी याने शेवटच्या षटकात शादाब खानला नॉन स्ट्राइकवर मांकडिंगने रनआऊट केले होते. यानंतर पुन्हा एकदा यावरून वाद सुरू झाला. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १२ धावांची गरज होती. शादाब खान आणि नसीम शाह क्रीजवर होते. पहिल्या चेंडूवर नॉन स्ट्राइकवर असलेल्या शादाबला फारुकीने धावबाद केले. यावर आता एबी डिव्हिलियर्सने प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता एका पाकिस्तानी पत्रकाराने एक्स (पूर्वीचे ट्विटर) अॅपवर शादाब खानच्या नॉन-स्ट्रायकरच्या एंडला रनआऊटबद्दल प्रश्न केला. यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, “कदाचित समालोचक एचडी अकरमन म्हणाले की, मला मांकडिंगची काही अडचण नाही, पण संघ डावाच्या ५व्या किंवा ६व्या षटकात असे का करत नाहीत? फक्त शेवटी का? सामना जिंकणे हाच एकमेव मार्ग आहे, असे वाटत असल्याने ते घाबरून हे करतात. अतिशय योग्य मुद्दा आहे.”

अफगाणिस्तान संघाचा अगदी थोडक्यात झाला होता पराभव –

पाकिस्तानी पत्रकाराला प्रत्युत्तर देताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला, “कारण फलंदाज डावाच्या शेवटीच धावा चोरण्याचा प्रयत्न करतात.” शादाब खान रनआऊट झाल्यानंतरही पाकिस्तानने १ चेंडू शिल्लक असताना १ गडी राखून सामना जिंकला. २ चेंडूत ३ धावा हव्या होत्या, त्यानंतर नसीम शाहने ५व्या चेंडूवर चौकार ठोकला. अफगाणिस्तानचा संघ विजयाच्या जवळ आल्यावर पराभूत झाला. पाकिस्तान संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: बुमराह-शमी नव्हे तर ‘हा’ खेळाडू मोठा विक्रम करण्यास सज्ज, बनू शकतो आशिया कपचा नंबर वन गोलंदाज

नॉन स्ट्रायकवर मांकडिंगने रनआऊट करण्यावरून वाद –

याआधीही नॉन स्ट्रायकर मांकडिंग करुन रनआऊट करण्यावर बराच वाद झाला आहे. यामुळे नेहमीच खिलाडूवृत्तीचा प्रश्न निर्माण होते. मात्र, अशा प्रकारे फलंदाजाला बाद करणे क्रिकेटच्या नियमानुसार योग्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) गेल्या वर्षी याला रनआऊटच्या श्रेणीत टाकले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ab de villiers sharp reply to a pakistani journalist who questioned shadab khans mankding vbm
First published on: 26-08-2023 at 15:45 IST