ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अभिनव बिंद्राने शुक्रवारी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करत १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.
स्पर्धेच्या सलामीच्याच दिवशी वेगवेगळ्या प्रकारांत भारताच्या खेळाडूंनी सात पदकांची कमाई केली. त्यावर आता अभिनव बिंद्राने ‘सोनेरी’ मुलामा देत आणखी एका पदकाची वाढ केली आहे. खुमकचाम संजीता चानूने पहिल्या दिवशी रताला सुवर्णपदकाची अनोखी भेट दिली आणि तिच्या पाठोपाठ भारताच्याच सेइखोम मिराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरले. त्यानंतर अभिनवच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून होते. अभिनवनेही चाहत्यांची अपेक्षापूर्ती करत भारताच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा रोवला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2014 रोजी प्रकाशित
अभिनवचा सुवर्णवेध
ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाज अभिनव बिंद्राने शुक्रवारी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करत १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

First published on: 25-07-2014 at 08:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhinav bindra wins gold medal in 10 metre air rifle shooting in commonwealth games 2014 in glasgow