सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवांचा कोणाला कधी त्रास होईल हे सांगता येणार नाही. अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी शोक व्यक्त करायला सुरुवात केली. यानंतर मोहम्मद नबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण देत आपल्या निधनाची बातमी खोटी असल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही स्थानिक क्रिकेट सामन्यात मोहम्मद नबी खेळत असल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

मोहम्मद नबीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. मात्र जगभरातल्या टी-२० क्रिकेट लीगमध्ये तो खेळत असतो. इंडियन प्रमिअर लिगमध्ये नबी सनराईजर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधीत्व करतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghan all rounder mohammad nabi clarifies on his feath rumors says its fake news psd
First published on: 05-10-2019 at 12:42 IST