मोहम्म्द शेहझाद आणि असगर स्टानिकझाई यांच्या अर्धशतकांच्या बळावर अफगाणिस्तानने स्कॉटलंडवर १४ धावांनी मात करून ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत विजयी सलामी नोंदवली.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ५ बाद १७० अशी धावसंख्या उभारली शेहझाद (६१) आणि स्टानिकझाई (५५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर स्कॉटलंडला निर्धारित षटकांत ५ बाद १५६ धावाच करता आल्या. यात जॉर्ज मुनसे (४१), कायले कोएत्झर (४०) आणि मॅट मचान (३६) यांनी योगदान दिले. अफगाणिस्तानच्या रशिद खानने २८ धावांत २ बळी घेतले, तर मोहम्मद नबी व समीउल्लाह शेनवारी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. सेहजाद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.