IND vs SL Asia Cup 2023 Final Highlights: २०१७ मध्ये विराट कोहलीने एका मुलाखतीत रोहित शर्मा अत्यंत विसराळू असल्याचे म्हटले होते. तो त्याचा आयपॅड, पासपोर्टही विसरतो. असेही कोहली म्हणाला होता. मध्यंतरी एका सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी तर नक्की आपल्याला फलंदाजी हवी आहे का गोलंदाजी हे सुद्धा शर्मा विसरला होता. आता रोहितच्या विसराळूपणाचं एक नवं उदाहरण समोर येत आहे. कालच्या तुफान भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यानंतर रोहितचे मेन इन ब्लु भारतात यायला त्वरितच निघाले होते. यावेळी भारताला आशिया कप फायनलची ट्रॉफी मिळवून देणाऱ्या संघाचा कर्णधार हॉटेलमध्येच एक महत्त्वाची गोष्ट विसरून आला होता.
रविवारी आशिया चषक 2023 फायनलमध्ये श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळविल्यानंतर रोहित शर्मा आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करण्यास विसरला नाही. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात चमकलेल्या मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, बुमराह, शिवाय शुबमन गिल, ईशान किशनचे कौतुक करताना रोहित म्हणाला की, “श्रीलंकेविरुद्ध भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. फायनलमध्ये दुसऱ्या देशात येऊन, परिस्थिती पाहून खेळताना विजय मिळवणं हे मानसिक बळ दाखवतं. गोलंदाजीने सुरुवात केली आणि बॅटने क्लिनिकल फिनिश केलं. मी स्लिपमध्ये उभा होतो आणि आम्हाला अभिमान वाटतो – आमचे सीमर्स खूप मेहनत घेत आहेत. ते पाहून बरं वाटले. ”
दरम्यान, टीम इंडियाने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या ६/२१ धावांच्या जोरावर श्रीलंकेचा डाव अवघ्या ५० धावांत गुंडाळला आणि त्यानंतर अवघ्या सहा षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला व दणदणीत विजय मिळवून टीम इंडिया आशिया कपसह भारतात परतली. यावेळी हॉटेल मधून बाहेर पडताना कर्णधार रोहित शर्मा हा आपला पासपोर्ट मात्र हॉटेलमध्येच विसरून आला होता. नशिबाने हे एका सपोर्ट स्टाफच्या लक्षात आल्याने बसमध्ये चढतानाच त्याला पासपोर्ट परत मिळाला.
Video: रोहित शर्मा हॉटेलमध्येच विसरून आला महत्त्वाची गोष्ट
रोहित शर्मा पुढे म्हणाला की टीम इंडियाने आशिया चषक २०२३ मधून संघ म्हणून जे काही साध्य करू शकलो ते सर्व केलं आहे. दबावाच्या परिस्थितीत हार्दिक आणि इशान यांनी पाकिस्तानविरुद्ध ज्या प्रकारे फलंदाजी केली आणि त्यानंतर केएल (राहुल) आणि विराट (कोहली) यांनी शतके केली. ज्या पद्धतीने (शुबमन) गिल फलंदाजी करत आहे. आता आम्ही फक्त भारतात येऊ घातलेल्या मालिकेची आणि त्यानंतर विश्वचषकाची आतुरतेने वाट पाहत आहोत.