Pat Cummins said that personally I am happy to be back in india: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२२ सप्टेंबर) मोहाली येथे खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना ५ विकेटने जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४८.४ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य पार केले. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या पराभवानंतर कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आपली प्रतिक्रिया दिली.

वैयक्तिकरित्या मला परत आल्याने आनंद झाला आहे –

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स सामन्यानंतर म्हणाला, “वैयक्तिकरित्या मी परत आल्याने आनंदी आहे. भारतात माझा पहिला सामना खेळताना बरे वाटले. आम्ही लाइनपर्यंत पोहोचू शकलो नाही हे निराशाजनक आहे. मला वाटते की काही खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली आणि गोलंदाजी केली, पण एकूण कामगिरी चांगली झाली नाही.”

ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्कच्या दुखापतीबाबत पॅट काय म्हणाला?

ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्कच्या दुखापतीबाबत तो म्हणाला की, “ते कदाचित दुसऱ्या सामन्यासाठी तयार नसतील आणि तिसऱ्या सामन्यात परततील. मॅक्सी नुकताच भारतात आला आहे. स्मिथ आणि वॉर्नरला एकत्र पाहून आनंद झाला. आम्ही मोठ्या स्पर्धांवर लक्ष ठेवत आहोत, परंतु तुम्हाला मानक लवकर सेट करायचे आहेत आणि चांगली गती वाढवायची आहे. अशा परिस्थितीत आम्हाला पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल.”

हेही वाचा – World Cup 2023: ‘मी कुलदीप यादवची निवड करु शकत नाही, कारण तो…’; पीसीबीचे निवडकर्ता इंझमाम-उल-हकचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिला वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर-१ टीम बनली आहे. भारतीय संघ आता पुढील सामना २४ सप्टेंबरला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळणार आहे. साहजिकच, टीम इंडिया दुसऱ्या वनडेत त्याच प्लेइंग इलेव्हनसह प्रवेश करेल आणि विजयाची मालिका कायम ठेवू इच्छित आहे. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या वनडेत कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे.