Virat Kohli Ahmedabad Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. या मालिकेतला चौथा सामना अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच अंतिम फेरीत पोहोचला आहे. दरम्यान, अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.
भारताला या सामन्यात पुनरागमन करायचं असेल तर संघ पूर्णपणे कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारावर अवलंबून आहे. कारण विराटकडून फारशा अपेक्षा नसतील. आम्ही असं म्हणतोय कारण विराट सध्या कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करतोय. तसेच अहमदाबादच्या खेळपट्टीवर त्याने अद्याप मोठी खेळी केलेली नाही.
पुजारा-रोहितवर मदार
चेतेश्वर पुजारासाठी मात्र हे स्टेडियम लकी आहे. कारण त्याने या मैदानावर यापूर्वी द्विशतक ठोकलं आहे. तसेच हे मैदान रोहितसाठी देखील लकी राहिलं आहे. पुजाराने या मैदानावर ४ कसोटी डावात २६५ धावा तर रोहितने ३ डावात १४० धावा फटकावल्या आहेत. कोहलीला या मैदानात ४ डावांमध्ये केवळ ६० धावा जमवता आल्या आहेत.
हे ही वाचा >> ‘या’ मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेत
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारतीय खेळाडूंची कामगिरी (सर्वाधिक धावा)
राहुल द्रविड – १४ डावांत ७७१ धावा
सचिन तेंडुलकर – १६ डावांत ६४२ धावा
व्हीव्हीएस लक्ष्मण – १३ डावांत ५७४ धावा
वीरेंद्र सहवाग – १३ डावांत ४९२ धावा
सौरव गांगुली – ८ डावांत ४११ धावा