MI vs LSG, Arjun Tendulkar Aggressive Video Gets Reaction: वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाकडून सचिन तेंडुलकरच्या लेकाला सुद्धा गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यंदाच्या हंगामातील अर्जुनचे हे पहिलेच षटक होते. या षटकात मार्कस स्टॉइनिसला धावबाद करण्याचे आव्हान स्वीकारले होते. आक्रमकरित्या गोलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर नेमका स्टॉइनिसच्या पॅडला चेंडू लागला होता पण हा बाद वाटल्याने अर्जुनने जोरदार अपील केली. खरंतर पंचांनी सुद्धा अर्जुनच्या बाजूने निकाल देत स्टॉइनिसला बाद दिले होते पण ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टॉइनिसने मोक्याच्या वेळी रिव्ह्यू घेतला व त्यात तो नाबाद सिद्ध झाला. हे सगळं घडत असताना अनेकदा अर्जुन हा स्टॉइनिसला खुन्नस देताना सुद्धा दिसून आला. सचिन तेंडुलकरच्या लेकाचा हा अंदाज स्वतः स्टॉइनिसला फार रुचला नाही हे त्याच्या अर्जुनकडे टाकलेल्या संतप्त लुकमधून स्पष्ट होत आहे. या काही सेकंदाच्या घडामोडीवरून ऑनलाईन सुद्धा चर्चा चालू आहे.

सचिन तेंडुलकर आठवला वाटतं!

मुंबईच्या अंतिम साखळी सामन्यासाठी जसप्रीत बुमराहच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलेल्या अर्जुनने सामन्याच्या दुस-या षटकात स्टॉइनिसला चार डॉट बॉल टाकले, ज्यात ऑसीसाठी एलबीडब्ल्यू बाद होण्याची भीती होती, तर ओव्हरमध्ये तीन धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर अर्जुनने खुन्नस देताच आधी स्टॉइनिस सुद्धा रागात त्याला ओरडायला गेला पण नंतर मस्करी करत असल्याचे दाखवत त्याने आपला चेहरा मागे वळवला. यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी कदाचित स्टॉइनिसने सचिनचा मान ठेवून अर्जुनवर राग काढणं टाळलं असावं असंही म्हटलं आहे. तर काहींना पहिल्याच सामन्यात अर्जुनने अनुभवी खेळाडूंना खुन्नस देणं पटलेलं नाही, सचिन मैदानात किती शांतपणे खेळायचा त्याची फक्त बॅटच बोलायची पण अर्जुनला हा शांतपणा सवयीचा नसल्याचं दिसतंय असंही काहींनी व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शन व कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
Passengers Inside Patna To Kanpur Train over seat issues
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक

२ चेंडूंवर २ षटकार आणि तेंडुलकरच्या लेकाची माघार

पहिल्या षटकात इतका नाट्यमय खेळल्यावर दुसऱ्या षटकात तरी अर्जुनला हवीहवीशी एखादी विकेट मिळतेय का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण दुसऱ्या षटकात अर्जुनच्या समोर स्वतः निकोलस पुरणचे झंझावाती वादळ होते. पुरणने न बोलताच स्टॉइनिसचा बदला घेत अर्जुनच्या दोन चेंडूंवर दोन जबरदस्त षटकार ठोकले. यानंतर तर अर्जुन तेंडुलकरच्या स्नायूंवर ताण आल्याने त्याला थेट पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. अवघ्या २.२ षटकात विकेट मिळवली नसली तरी अर्जुन चर्चेत राहण्यात यशस्वी झाला हे खरं.

दरम्यान, आयपीएल २०२४ मध्ये अर्जुनचा हा पहिलाच सहभाग होता. त्याने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आणि काही अनुभवी क्रिकेटपटूंना प्रभावित करताना चार सामन्यांत तीन विकेट्स घेतल्या होत्या.

हे ही वाचा<<“माझा कर्णधारपदाचा मंत्र सोपा, मी निकाल बघत..”, हार्दिक पांड्याने MI च्या शेवटच्या मॅचआधी सांगितली स्वतःची जबाबदारी

दुसरीकडे, मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स सामन्यात मुंबईचा संघ पुन्हा एकदा १८ धावांनी पराभूत झाला. अर्थात मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर असल्याने ही केवळ मान जपण्याची मॅच होती. हार्दिकच्या नेतृत्वाखालील संघ सध्या या हंगामात केवळ चार विजयांसह गुणतालिकेत