Gautam Gambhir contacted by BCCI for Team India head coach : बीसीसीआयने गौतम गंभीरला २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर दिली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. वास्तविक, टी-२० वर्ल्ड कप २०२४ नंतर राहुल द्रविड यांचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ आगामी विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला. सोमवारी, बीसीसीआयने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत.

दरम्यान, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालातून असे समोर आले आहे की, बीसीसीआयला वाटते की गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळावी . वास्तविक, गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. याआधी गंभीर लखनऊ सुपर जायंट्सशी संबंधित होता. दोन वर्षे तो या संघाचे मार्गदर्शक होता. मात्र, तो आयपीएल २०२४ मध्ये केकेआर संघात परतला आहे.

Akash Chopra Gives Stern Warning to Gautam Gambhir
रोहित-विराटचा संदर्भ देत भारताचा कोच होणाऱ्या गंभीरला माजी खेळाडूने दिला इशारा, म्हणाले; “संघातले बरेचसे खेळाडू…”
Gautam Gambhir Team India Head coach Interview Today
गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षकपदासाठी एकमेव अर्जदार; आज होणार मुलाखत
Gautam Gambhir is sure to take over as the head coach of Team India after the T20 World Cup 2024
Team India : गौतम गंभीरचं नाव कोचपदासाठी शर्यतीत, राहुल द्रविडच्या जागी सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
Rahul Dravid comments on coaching post
T20 World Cup 2024 : राहुल द्रविड म्हणतो, आमुचा रामराम घ्यावा
BCCI Got Fake Head Coach Applications named Narendra Modi Tendulkar dhoni
नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमित शाह यांच्या नावाने भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज, वाचा काय घडलं
Gautam Gambhir meets Jay Shah after IPL 2024 Final
IPL 2024 Final : गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक? जय शाह यांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
BCCI Secretary Jai Shah clarification regarding the coaching position that he has no contact with former Australian players
ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंशी संपर्क नाही; प्रशिक्षकपदाबाबत ‘बीसीसीआय’ सचिव जय शहा यांचे स्पष्टीकरण
Jay Shah Statement on India Head Coach Offer
“प्रशिक्षक पदासाठी कोणत्याच ऑस्ट्रेलियन खेळाडूशी चर्चा केली नाही…” जय शाह यांनी पाँटिंग-लँगरची केली पोलखोल

तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच प्रशिक्षक असेल –

अलीकडेच, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो ३.५ वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल. टी-२० विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. मुख्य प्रशिक्षकपदावर राहण्यासाठीही त्यांना अर्ज करावा लागणार आहे. बीसीसीआयकडे अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे ठेवली आहे.

हेही वाचा – दिनेश कार्तिक आयपीएल २०२५ मध्ये CSK च्या ताफ्यात जाणार? सोशल मीडियावर ऋतुराजबरोबर चर्चा, स्टोरी व्हायरल

व्हीव्हीएस लक्ष्मणलाही संधी –

व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर आणि जस्टिन लँगरसारखे क्रिकेटपटू या पदासाठी अर्ज करू शकतात. लक्ष्मणने अर्ज केल्यास ते सर्वात मोठा दावेदार असतील. ४९ वर्षीय माजी भारतीय क्रिकेटपटू गेल्या तीन वर्षांपासून एनसीएचे प्रमुख आहेत. भारत अ आणि अंडर-१९ संघही त्याच्या देखरेखीखाली आहेत. द्रविडच्या अनुपस्थितीत त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचीही भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली, हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेव्यतिरिक्त, इंग्लंड, न्यूझीलंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावरही प्रशिक्षक होते. मात्र, स्थायी मुख्य प्रशिक्षकपदासाठी लक्ष्मण हे सर्वोच्च उमेदवार नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

हेही वाचा – MI vs LSG : रोहित-नमनच्या अर्धशतकी खेळी व्यर्थ; मुंबईची हंगामअखेर पराभवानेच

फ्लेमिंगने प्रशिक्षक व्हावे, अशी बीसीसीआयची इच्छा –

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या यादीत स्टीफन फ्लेमिंगचे नाव देखील समाविष्ट आहे. न्यूझीलंडचे माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवायचे आहे. फ्लेमिंग या पदासाठी अर्ज करतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण यासाठी त्यांना वर्षातून १० महिने संघासोबत राहावे लागणार आहे. वृत्तानुसार, २००९ पासून सीएसकेचे प्रशिक्षक असलेले फ्लेमिंग यांच्याकडे द्रविडच्या जागी योग्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. भारतीय संघात पुढे मोठे बदल होऊ शकतात आणि फ्लेमिंगकडे परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे.