भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला आहे. संपूर्ण देश सरकार आणि लष्कराबरोबर उभा असताना आणि पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत असताना, माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूच्या एका पोस्टमुळे गोंधळ उडाला आहे.

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, प्रत्येक भारतीय आपल्या देश भारतासह उभा आहे, परंतु चाहत्यांनी अंबाती रायुडूवर आपल्या देशाला पाठिंबा देत नसल्याचा आरोप केला आहे. मग अंबाती रायुडूचे ट्विट व्हायरल का होत आहे? यामागील कारण काय आहे?

पाकिस्तानकडून जेव्हा भारतावर ड्रोन हल्ला सुरू केला त्यादरम्यान अंबाती रायुडूने ट्विट केलं की, “कोणी डोळे दाखवले तर आपणही त्याला डोळे दाखवले तर संपूर्ण जगाला ते आंधळं करू शकतं.” ही ओळ लिहिण्यामागील कारण फक्त रायुडूलाच माहित असेल, पण चाहत्यांना ते अजिबात आवडलं नाही. जेव्हा भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तेव्हा रायुडू काहीच बोलला नाही. पण आता रायुडू वक्तव्य करत असल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

त्याची पोस्ट भारतीय चाहत्यांना आवडलेली नाही आणि त्यांनी रायुडूच्या ट्विटवर टीका केली. पहिला हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता, त्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले, त्यामुळे भारताने स्वतःचे रक्षण करू नये का, असा प्रश्न युझर्सने रायडूला कमेंटमध्ये विचारला. रायुडूने त्याची पोस्ट डिलीट केली नाही पण काही वेळाने त्याने एक नवीन पोस्ट केली आणि शांतीची कामना केली. यानंतर त्याने काही वेळाने मोठी पोस्ट शेअर केली.

रायुडूने पुढे या ट्विटमध्ये लिहिले की, कोणी डोळे दाखवले तर आपणही त्याला डोळे दाखवले तर संपूर्ण जगाला ते आंधळं करू शकतं. हे कमकुवतपणाचं लक्षण नाही तर शहाणपणाची आठवण करून देणारं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. न्याय मिळवला पाहिजे पण मानवतेला कधीही धक्का नाही लागला पाहिजे. आपण हृदयात करूणा ठेवूनही आपल्या राष्ट्रावर प्रेम करू शकतो. देशभक्ती आणि शांतता एकत्र चालू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Fans Reply on Ambati Rayudu Tweet
Fans Reply on Ambati Rayudu Tweet

चाहत्यांनी मात्र रायुडूच्या या स्पष्टीकरण देणाऱ्या पोस्टवरही टीका केली आहे आणि चांगलंच त्याला ट्रोल केलं आहे. चाहत्यांनी रायुडूला प्रश्न विचारत त्याला चांगलंच सुनावलं आहे.