गुवाहाटी : जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिवा थापा आणि आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमित पांघलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

कर्मवीर नवीन चंद्रा बोडरेलोई बंदिस्त स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या अन्य पाच खेळाडूंनीही उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे. थापाने मॉरिशसच्या हेलेने डॅमियन याचा ५-० असा धुव्वा उडवला. आता उपांत्य फेरीत त्याला पोलंडच्या डी. ख्रिस्तियन स्केपांस्की याच्याशी लढत द्यावी लागेल.

५२ किलो वजनी गटात अमित पांघलने थायलंडच्या चाकापोंग चानपीरोम याला ५-० असे सहज पराभूत केले. गौरव सोलंकी याने याच गटात मलेशियाच्या लुइस फ्लेउरोट याला ५-० असे हरवले. ५६ किलो गटात, कविंद्र सिंग बिश्त याने मारियो फर्नाडेझचा ३-२ असा पराभव केला. याच गटात गौरव बिदुरीने बायरामहान पेर्मानोव्ह याच्यावर ५-० अशी सरशी साधली. ६० किलो गटात मनीष कौशिकने थायलंडच्या थिवा जांथाकुम्पा याच्यावर ५-० अशी मात केली.

 

शिवा थापा