भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेतील अडथळ्यांची शर्यत कायम आहे. सहाव्या फेरीत आनंदला रशियाचा ग्रँडमास्टर अलेक्झांडर ग्रिस्चुकने पराभूत केले. या पराभवामुळे आनंदची नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
सलग तीन डावांत बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर आनंदला चौथ्या फेरीत हिकारू नाकामुराने पराभूत केले. त्यानंतर पाचव्या फेरीत आनंदने संघर्ष करत व्हॅसेलीन टोपालोव्हवर विजय मिळवून स्पध्रेतील आव्हान कायम राखले. मात्र पुन्हा त्याच्या वाटय़ाला पराभव आल्याने तो चौथ्या स्थानावरून नवव्या स्थानावर गेला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2015 रोजी प्रकाशित
आनंदचा पराभव
भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पध्रेतील अडथळ्यांची शर्यत कायम आहे

First published on: 12-12-2015 at 01:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand loose his match