लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धा
लंडन चेस क्लासिक स्पर्धेत पहिलावहिला विजय मिळवण्याची संधी विश्वनाथन आनंदला मिळणार आहे. इंग्लंडच्या ल्यूक मॅकशेनीविरुद्ध भरपूर चुका झाल्याने तर अर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियन संधी घालवल्यामुळे आनंदला विजयापासून वंचित राहावे लागले होते. व्लादिमीर क्रॅमनिकविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्याने आनंदला विजयाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. मात्र पाचव्या फेरीत इंग्लंडच्या गावेन जोन्सवर मात करत पहिला विजय मिळवण्याची आनंदला संधी आहे. सलग १७ लढतींमध्ये आनंदला विजय मिळवता आलेला नाही. चौथ्या फेरीअखेर तीन सामने बरोबरीत सुटल्याने आनंदनच्या नावावर अवघे तीन गुण आहेत.