Anaya Bangar On His Marriage: अश्नीर ग्रोवरचा राईज अँड फॉल हा रिअॅलिटी शो सध्या तुफान चर्चेत आहे. हा शो सुरू होऊन अवघे ३ दिवस झाले आहेत. अवघ्या ३ दिवसात या शो ची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. या शो मध्ये अनाया बांगरने देखील सहभाग नोंदवला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनाया बांगर म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या काही महिन्यात ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे. आता राईज अँड फॉल या शो मध्ये बोलताना तिने, मुलं तिच्यासोबत लग्न करण्यासाठी किती उत्सुक आहेत याबाबत खुलासा केला आहे.
या शो मध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आता तिने आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. आर्यनची अनाया झाल्यानंतर तिला अनेकांनी लग्नासाठी विचारलं. तिने राईज अँड फॉल या शो मध्ये आकृती नेगीसोबत बोलताना याबाबत खुलासा केला.
आकृतीसोबत चर्चा करताना अनाया म्हणाली की, ” मी खरं सांगते, कमेंट सेक्शनमध्ये लोकं मला वाईट बोलतात. पण हिच लोकं मला प्रेमाने मेसेज करतात. सोशल मीडियावर अनेक तरूण माझ्यासोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहेत. मला सोशल मीडियावर हजारो मेसेज येतात. पण मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही. आतापर्यंत ३० ते ४० हजार लोकांनी मला लग्नासाठी विचारलं आहे. मी लग्न करण्यासाठी खूप उत्सुक आहे. पण सर्वांशी संवाद साधण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही.”
लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनाया बांगर तुफान चर्चेत आहे. या शो मध्ये ती फार काही बोलताना दिसून आलेली नाही. शांतीत क्रांती करत असलेल्या अनायाचा अंदाज चाहत्यांना खूप आवडतोय. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता या शो मुळे तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायला मिळणार आहे.