वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू आंद्रे रसेल सध्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) खेळत असून यावेळी अगदी विचित्र पद्धतीने आऊट झाला. रसेल मिनिस्टर ग्रुप ढाकाकडून खेळत असून यावेळी तो आऊट झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसावं की रडावं हे कळणार नाही. खुलाना टायगर्सविरोधात खेळत असताना आपल्याच चुकीमुळे गरज नसतानाही रसेलने आपला विकेट गमावला.

झालं असं की, रसेलने फलंदाजी करत असताना परेराच्या गोलंदाजीलवर थर्ड मॅनकडे चेंडू टोलावला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला असणाऱ्या मोहमदुल्लाहने धाव घेतली असता त्याचवेळी क्षेत्ररक्षण कऱणाऱ्या मेहंदी हसनने चेंडू स्ट्राइकर एंडच्या दिशेने फेकला. हा चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला, पण तोपर्यंत मोहमदुल्लाह पोहोचला होता. पण हे सगळं इथंच संपलं नाही.

चेंडू टोलावल्यानंतर रसेल नॉन स्ट्राइकर एंडच्या दिशेने धावत होता. मेहंदी हसनचा चेंडू स्टंपवर लागल्यानंतर त्याच वेगाने नॉन स्ट्राइकर एंडच्या स्टंपला जाऊन लागला. यावेळी रसेलला मात्र चेंडू येत असल्याची कल्पनाच नव्हती आणि रन आऊट झाला. आपण आऊट झालोय यावर रसेलचा विश्वासच बसत नव्हता, पण मैदानाबाहेर जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.

हा पहा व्हिडीओ –

मिनिस्टर ग्रुप ढाकाने दिलेलं १८४ धावांचं आव्हान खुलाना टायगर्सने पाच गडी राखत जिंकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी भारतीय क्रिकेटर वसीम जाफरने ही घटना अविश्वसनीय असून याआधी असं कधीच पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. “मी आतापर्यंत क्रिकेट खेळत आणि पाहत आलो आहे, पण असं कधी पाहिलं नाही. अगदी अविश्वसनीय,” असं ट्वीट वसीम जाफरने केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.