यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र ८ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-अफगाणिस्तान या सामन्यात विराट कोहलीने कमाल केली. त्याने या सामन्यात आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. विशेष म्हणजे पहिल्या षटकापासून फलंदाजीसाठी आल्यानंतर शेवटच्या शटकापर्यंत तो तुफान फटकेबाजी करत होता. त्याने या सामन्यात १२२ धावांची नाबाद शतकी खेळी केली. याच कामगिरीनंतर विराटची पत्नी अनुष्का शर्माने त्याचे तोंडभरून कौतूक केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्यासोबत असेन, असे अनुष्का म्हणाली आहे.

हेही वाचा >>>आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शतकदुष्काळ संपुष्टात! ; तब्बल १०२० दिवसांनंतर कोहलीला यश; भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय  

मागील साधारण दोन वर्षांपासून विराट कोहली धावांसाठी झगडत होता. या काळात अनेकवेळा तो शून्यावर बाद झाला. सातत्याने खराब कामगिरी करत असल्यामुळे विराटची कारकीर्द धोक्यात आली आहे, असेदेखील मत मांडले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा विराट आपल्या जुन्या अवतारात परतला आहे. त्याने आशिया चषकात धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडलंय. अफगाणिस्ताविरोधातील सामन्यात विराटने नाबाद १२२ धावा केल्यामुळे त्याची पत्नी अनुष्काने त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी, मी कायम तुझ्यासोबत असेन, असे अनुष्काने विराट कोहलीला उद्देशून आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >>> पाकिस्तानच्या क्रिकेटरला भारताच्या ‘डिंपल गर्ल’ची भुरळ, खास फोटो शेअर करत म्हणाला; “माझी सर्वांत…”

दरम्यान, विराट कोहलीने अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात दिमाखदार फलंदाजी केली. ६१ चेंडूंमध्ये तब्बल १२ चौकार आणि ६ षटकार लगावत नाबाद १२२ धावा केल्या. विराटचे हे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक तर टी-२० क्रिकेट प्रकारालीत पहिले शतक आहे. त्याच्या या कामगिरीनंतर भारतातील तसेच जगभरातील क्रिकेटप्रेमी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करित आहेत.