Arshdee Akashdeep Morne Morkel Fight Video: भारत वि. इंग्लंड कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ १-०ने आघाडीवर आहे. तर दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून बर्मिंगहममध्ये खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करावी लागलेली टीम इंडिया पुनरागमनासाठी प्रयत्नशील असेल. यासाठी संघातील खेळाडूही जोरदार सराव करत आहेत. या सराव सत्रादरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्शदीप सिंग, आकाशदीप आणि कोच मॉर्ने मॉर्केल मस्ती करत आहेत.
भारतीय संघाचे खेळाडू आता इंग्लंडच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. सराव सत्रात फलंदाजांनी सराव केला आणि गोलंदाजांनी त्यांच्या लाईन-लेंथवर काम केलं. कर्णधार आणि प्रशिक्षक देखील खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.
भारतीय संघाच्या सराव सत्रात WWE फायटिंग पाहायला मिळाली. अर्शदीप सिंग आणि मॉर्ने मॉर्कल एकमेकांशी भिडताना दिसत होते. जणू काही दोघं कुस्ती खेळत होते. त्यानंतर त्यांच्या या कुस्तीत आकाशदीपही सामील झाला. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.
सराव सत्रादरम्यानचा एक मजेशीर व्हीडिओ व्हायरल होत आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आकाश दीप यांनी टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्याशी कुस्ती खेळताना दिसले. दोन्ही खेळाडू आणि कोच एकमेकांशी मस्ती करत होते. तिघंही हसत खेळत मजा करताना दिसले. पण त्यांची ही मजेशीर कुस्ती सध्या व्हायरल होत आहे.
अर्शदीप सिंग आणि मॉर्ने मॉर्केल यांनी आधी कुस्तीला सुरूवात केली. पण नंतर अर्शदीप सिंगने आकाश दीपसह मिळून मोर्ने मॉर्केलला जमिनीवर झोपवलं आणि त्याला पकडून ठेवलं. मॉर्केलने स्वत:ला सोडवल्यानंतर त्याने अर्शदीपला पकडलं आणि त्याल मैदानावर लोळवलं आणि गुदगुल्या करत होता.
एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियासाठी पुनरागमन करणं सोपं असणार नाही. एजबॅस्टन येथे टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत एजबॅस्टन बर्मिंगहम येथे ८ सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी ७ सामने गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी एजबॅस्टनमधील इतिहास बदलावा लागेल आणि त्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.