इंग्लंडचा कर्णधार जो रूट जबरदस्त फॉर्मात आहे. ब्रिस्बेनमध्ये अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने अ‍ॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट कसोटीतही आघाडी घेतली आणि अर्धशतक झळकावले. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत त्याने १०३ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. रूटने आधी सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याने २०२१ मध्ये १६०० कसोटी धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मोसमात कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत. या मोसमात रूटने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केली. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने या बाबतीत गावसकर आणि तेंडुलकर यांना मागे टाकले. एका कॅलेंडर वर्षात अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – ASHES : अरेरे काय हे..! ICCचा इंग्लंडला अजून एक धक्का; ‘या’ कारणामुळे मॅच फी कापली आणि सोबतच…

सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये १५६२ धावा केल्या होत्या, ज्या रूटने १५६३ धावा करून त्याला मागे टाकले. रूटने यापूर्वी गावसकरांना मागे टाकले होते. गावसकरांनी १९७९ मध्ये १५४९ धावा केल्या होत्या. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफच्या नावावर आहे, ज्याने २००६ मध्ये १७८८ धावा केल्या होत्या.

अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीतच्या पहिल्या डावात जो रूटने ६२ धावांची खेळी केली. ११६ चेंडूंचा सामना करताना त्याने ७ चौकार ठोकले. ग्रीनच्या गोलंदाजीवर त्याचा स्टीव्ह स्मिथने झेल घेतला. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफरनेही रूटचे ट्विटरद्वारे कौतुक केले आहे.

तो म्हणाला, ”जो रूटला पाहत बसण्याचा आनंद आहे. डोळ्यांना ते सोपे दिसते, पण तो काही कठीण धावा काढतो. फिरकीविरुद्धच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी तो एक आहे आणि सध्या कोहली, स्मिथ आणि विल्यमसन यांच्यापेक्षाही कदाचित सर्वोत्तम आहे. किती वर्षं तो एकट्याने इंग्लिश फलंदाजी विभाग सांभाळत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashes joe root surpasses sachin tendulkar and sunil gavaskar records in test cricket adn
First published on: 18-12-2021 at 13:39 IST