Asia Cup 2022 Final, Pakistan vs Sri Lanka : यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लाढत रंगणार आहे. आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून सायंकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल.

सुपर-४ फेरीतील अंतिम सामन्यात याच दोन संघांमध्ये सामना रंगला होता. यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Live Updates

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan, 11 September 2022 : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंका-पाकिस्तान आमने-सामने, जाणून घ्या सामन्याचे लाईव्ह अपडेट

23:23 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : श्रीलंकेचा पाकिस्तानवर २३ धावांनी दणदणीत विजय

श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवत आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे.

23:19 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १९व्या षटकानंतर पाकिस्तानच्या १३९ धावा

१९व्या षटकानंतर पाकिस्तानच्या १२० धावा झाल्या असून त्याचे आठ गडी बाद झाले आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ६ चेंडूत ३२ धावांची आवश्यकता आहे.

23:11 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १८व्या षटकानंतर पाकिस्तानच्या १२० धावा

१७व्या षटकानंतर पाकिस्तानच्या १२० धावा झाल्या असून शेवट्या चेंडून शादाब खान तंबूत परतला आहे. पाकिस्तानचे एकून आठ गडी बाद झाले असून पाकिस्तानला विजयासाठी १२ चेंडूत ५१ धावांची आवश्यकता आहे.

23:07 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १७व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ११२ धावा

१७व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ११२ धावा झाल्या असून त्याचे सात गडी बाद झाले आहेत. पाकिस्तानला विजयासाठी १७ चेंडूत ५५ धावांची आवश्यकता आहे.

23:05 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पाकिस्तानला लोगापाठ तीन झटके

पाकिस्तानला लागोपाठ तीन झटके बसले असून मोहम्मद रिझवान, असिफ अली आणि खूशदील बाद झाले आहेत. पाकिस्तानला १९ चेंडूत ५९ धावांची आवश्यकता आहे.

23:01 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १६व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ११० धावा

१६व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ११० धावा झाल्या असून त्याचे चार गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी २३ चेंडूत ६१ धावांची आवश्यकता आहे.

22:59 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : मोहम्मद रिझवानची अर्धशकतीय खेळी

मोहम्मद रिझवाने ४७ चेंडूत अर्धशतकीय खेळी करत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने इफ्तिखार अहमदबरोरब ७१ धांवांची भागीदारी केली.

22:51 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १५व्या षटकानंतर पाकिस्तानच्या १०१ धावा

१५व्या षटकानंतर पाकिस्तानच्या १०१ धावा झाल्या असून त्याचे चार गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ३० चेंडूत ७० धावांची आवश्यकता आहे.

22:47 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १४व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ९७ धावा

१४व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ९७ धावा झाल्या असून त्याचे चार गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि मोहम्मद नवाज मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ३६ चेंडूत ७५ धावांची आवश्यकता आहे.

22:45 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पाकिस्तानला चौथा झटका, इफ्तिखार अहमद बाद

पाकिस्तानला तिसरा झटका बसला असून इफ्तिखार बाद झाला आहे. त्याने दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३० चेंडूत ३२ धावा केल्या.

22:40 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १३व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ९१ धावा

१३व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ९१ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान (४४) आणि इफ्तिखार (३२) मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ४३ चेंडूत ८० धावांची आवश्यकता आहे.

22:36 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १२व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ८८ धावा

१२व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ८८ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ४८ चेंडूत ८३ धावांची आवश्यकता आहे.

22:32 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : ११व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ७४ धावा

११व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ७४ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ५५ चेंडूत ९९ धावांची आवश्यकता आहे.

22:25 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १०व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ६८ धावा

१० व्या षटकानंतर पाकिस्तानच्या ६८ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत. पाकिस्तानला विजयासाठी ६० चेंडूत १०३ धावांची आवश्यकता आहे

22:24 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : नवव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ६५ धावा

नवव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ६५ धावा झाल्या असून त्यांचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत.

22:22 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पाकिस्तानच्या ६० धावा, श्रीलंकेला तिसऱ्या बळीचा शोध

पाकिस्तानच्या ६० धावा झाल्या असून ६४ चेंडूंमध्ये आणखी १०६ धावांची गरज आहे.

22:10 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : सातव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ४३ धावा

सातव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ४३ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत.

22:06 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : सहाव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ३७ धावा

सहाव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ३७ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत.

22:01 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पाचव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ३२ धावा

पाचव्या षटकानंतर पाकिस्तानच्या ३२ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत.

21:58 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : चौथ्या षटकानंतर पाकिस्तानच्या २५ धावा

चौथ्या षटकानंतर पाकिस्तानच्या २५ धावा झाल्या असून त्याचे दोन गडी बाद झाले आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार मैदानात आहेत.

21:54 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पाकिस्तानला दुसरा झटका

पाकिस्तानला दुसरा झटका बसला असून फकर झमन शुन्यावर बाद झाला आहे.

21:52 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पाकिस्तानला पहिला झटका

पाकिस्तानला पहिल्या झटका बसला असून कर्णधार बाबर आझम ५ धावांवर बाद झाला आहे.

21:49 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : तिसऱ्या षटकानंतर पाकिस्तानच्या २० धावा

तिसऱ्या षटकानंतर पाकिस्तानच्या २० धावा झाल्या असून सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम मैदानात आहेत.

21:45 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : दुसऱ्या षटकानंतर पाकिस्तानच्या १६ धावा

दुसऱ्या षटकानंतर पाकिस्तानच्या १६ धावा झाल्या आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम मैदानात आहेत.

21:43 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : पहिल्या षटकानंतर पाकिस्तानच्या १२ धावा

पहिल्या षटकानंतर पाकिस्तानच्या १२ धावा झाल्या आहे. पहिल्या षटकात चार वाईड चेंडू गेल्याने श्रीलंकेला ९ धावा अतिरिक्त मिळाल्या.

21:20 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : श्रीलंकेचे पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान

भानुका राजपक्षेने अर्धशतकीय खेळीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. तर पाकिस्तानच्या हॅरिस रौफने ४ षटकांत सर्वाधिक ३ बळी घेतले.

21:11 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १९व्या षटकानंतर श्रीलंकेच्या १५५ धावा

१९व्या षटकानंतर श्रीलंकेच्या १५५ धावा झाल्या असून त्यांचे सहा बळी गेले आहेत. सध्या भानुका राजपक्षे ( ५७ ) आणि करुणारत्ने ( १३ ) मैदानात आहेत.

21:07 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : राजपक्षेची अर्धशकतीय खेळी

श्रीलंकेचे पाच बळी गेले असताना राजपक्षेने ३५ चेंडूत अर्धशतकीय खेळी करत श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने हरसंगा बरोबर अर्धशकतीय भागिदारी केली.

21:07 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १८व्या षटकानंतर श्रीलंकेच्या १४७ धावा

१८व्या षटकानंतर श्रीलंकेच्या १४७ धावा झाल्या असून त्यांचे सहा बळी गेले आहेत. सध्या भानुका राजपक्षे ( ५० ) आणि करुणारत्ने ( १२ ) मैदानात आहेत.

21:00 (IST) 11 Sep 2022
SL vs PAK : १७व्या षटकानंतर श्रीलंकेच्या १३६ धावा

१७व्या षटकानंतर श्रीलंकेच्या १३६ धावा झाल्या असून त्यांचे सहा बळी गेले आहेत. सध्या भानुका राजपक्षे (४५) आणि करुणारत्ने (१०) मैदानात आहेत.

PAK vs HK Asia Cup 2022

आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून सायंकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल. आजच्या सामन्यात कोण सरस ठरणार तसेच ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.