शारजा : कमी धावसंख्येच्या आव्हानानंतरही अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक गडी राखून पराभव केला आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. भारत आणि अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर अडखळला होता. विजयासाठी अखेरच्या षटकांत ११ धावांची आवश्यकता असताना नसीम शाहने फजलहक फारुकीच्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत पाकिस्तानचा विजय साकार केला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या फलंदाजाना फार काही मोठी मजल मारता आली नव्हती. आक्रमक सलामीनंतर अफगाणिस्तानचा डाव अडखळला होता. मोहम्मद नवाझ आणि शादाब खान यांच्या फिरकीने अफगाणिस्तानला रोखले होते.

संक्षिप्त धावफलक अफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १२९ (इब्राहिम झादरान ३५, हजरतुल्ला झझाई २१; हरिस रौफ २/२६) पराभूत वि. पाकिस्तान : १९.२ षटकांत ९ बाद १३१ (शादाब खान ३६, इफ्तिकार अहमद ३०; फजलहक फरुकी ३/३१, फरिद अहमद ३/३१)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2022 pakistan beats afghanistan in last over thriller zws
First published on: 08-09-2022 at 00:30 IST