scorecardresearch

Asia Cup 2022: विराट कोहलीच्या ‘या’ सवयीमुळे स्टार खेळाडू ऋषभ पंत हैराण; म्हणाला मी जर का..

Asia Cup 2022 Team India: टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात विराट कोहलीसह रिषभ पंत सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे.

Asia Cup 2022: विराट कोहलीच्या ‘या’ सवयीमुळे स्टार खेळाडू ऋषभ पंत हैराण; म्हणाला मी जर का..
फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस

Virat Kohli & Rishabh Pant: कॅप्टन कूल एम एस धोनीच्या प्रशिक्षणात तयार होऊन सुद्धा विराट कोहलीचा स्वभाव अगदी उलट आहे. धोनी जितका शांत त्याहून दुप्पट रागीट विराट आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. आजवर अनेकदा विराटच्या रागाचे प्रत्यक्ष उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना नव्या पिढीतील अनेक टीम इंडियाच्या खेळाडूंना याच रागामुळे खडेबोल ऐकून घ्यावे लागले होते. विराटच्या अशाच सवयीवरून भारताचा स्टार खेळाडू व यष्टिरक्षक ऋषभ पंत याने ऑनलाईन भाष्य केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने २०१८ साली पदार्पण केले होते, या इंग्लंड दौऱ्यात आपल्याला विराटची जितकी भीती वाटत होती कोणाचीच वाटली नव्हती असे पंतने सांगितले. “मी कोणाला घाबरत नाही पण विराट कोहलीच्या रागवण्याच्या सवयीची मला भीती वाटते, असे पंतने दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हँडलवरील एका व्हिडिओमध्ये म्हंटले आहे. (हे ही वाचा: Asia Cup 2022: IND vs PAK सामन्याआधी आफ्रिदी-विराटची भेट; कोहलीला म्हणाला,’आम्ही प्रार्थना करतो की तुला’..)

पुढे पंत म्हणाला की कोहलीला फक्त तेव्हाच राग येतो जेव्हा खेळाडूने काहीतरी चुकीचे केले असेल, याचा अर्थ असा होतो की पुन्हा तीच चूक टाळण्याची शिकवण मिळावी म्हणूनच कोहली चिडतो. जर तुम्ही सर्व काही बरोबर करत असाल तर त्याला (कोहली) का राग येईल? पण जर तुम्ही चूक केली आणि कोणी तुमच्यावर रागावले तर ते चांगले आहे कारण तुम्ही फक्त तुमच्या चुकांमधून शिकता,” पंत म्हणाला.

पंतने इंग्लंड दौऱ्यात आदिल रशीदविरुद्ध त्याच्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये मारलेला षटकार अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. कसोटी सामन्याचे स्वरूप आक्रमक करणाऱ्या नवीन फळीतील क्रिकेटपटूंमध्ये ऋषभ पंतचे नाव घेतले जाते, त्याने आजवर ३१ सामन्यांमध्ये ४३. ६२ च्या सरासरीने २१२३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये पाच शतकांचा समावेश आहे. (हे ही वाचा: India Vs Pakistan सामन्याआधी धोनीच्या आठवणीत विराट झाला भावूक; रात्री फोटो पोस्ट करत म्हणाला..)

आगामी आशिया चषकमध्ये भारत आणि पाकिस्तान २८ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. सामन्यापूर्वी दोन्ही संघ जोरदार सराव करत आहेत. टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात विराट कोहलीसह ऋषभ पंत सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या