Asia Cup 2025: आशिया चषकात आज होणाऱ्या सामन्यात श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. अफगाणिस्तानचा साखळी फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. गेल्या सामन्यात अफगाणिस्तानला बांगलादेशकडून थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आज होणारा सामना हा अफगाणिस्तानसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळवण्याची संधी होती. पण हा सामना अफगाणिस्तानच्या हातून थोडक्यात निसटला. आता स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर अफगाणिस्तानला हा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना जिंकून अफगाणिस्तानचे ४ गुण होतील. पण नेट रनरेट चांगला असल्याने अफगाणिस्तानचा संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल.

अफगाणिस्तानची गोलंदाजी मजबूत आहे. पण फलंदाजी अजूनही चिंतेचं कारण आहे. गेल्या सामन्यात छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव आटोपला. तर श्रीलंकेचा संघ बांगलादेशविरुद्ध खेळवलेल्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल करणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

राशिद खानच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत २ सामने खेळले आहेत. २ पैकी एका सामन्यात अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. २ गुणांसह अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. श्रीलंका आणि बांगलादेश दोन्ही ४-४ गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. श्रीलंकेने २ पैकी २ सामने जिंकले आहेत. २ गुणांसह श्रीलंकेचा संघ अव्वल स्थानी आहे.

अशी असू शकते बांगलादेशची प्लेइंग ११: राशिद खान (कप्तान), सेदिकुल्लाह अटल, रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इब्राहिम जदरान, मोहम्मद नबी, गुलबदीन नइब , अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, फजलहक फारुकी,नूर अहमद, अल्लाह गजनफर

अशी असू शकते श्रीलंकेची प्लेइंग ११: चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टिरक्षक), कामिल मिशारा, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, महेश थिक्षणा, दुष्मंता चमीरा, नुवान तुषारा.