Asia Cup Cricket Tournament Indian Women Team Winning Start ysh 95 | Loksatta

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय महिला संघाचा विजयी प्रारंभ; श्रीलंकेवर ४१ धावांनी मात; जेमिमाची अर्धशतकी खेळी

जेमिमा रॉड्रिग्जच्या (५३ चेंडूंत ७६ धावा) अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या लढतीत श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय महिला संघाचा विजयी प्रारंभ; श्रीलंकेवर ४१ धावांनी मात; जेमिमाची अर्धशतकी खेळी
सामनावीर : जेमिमा रॉड्रिग्ज

पीटीआय, सिल्हेट (बांगलादेश) : जेमिमा रॉड्रिग्जच्या (५३ चेंडूंत ७६ धावा) अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या लढतीत श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या १५१ धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार चमारी अटापट्टू (५) आणि मालशा शेहानी (९) लवकर बाद झाल्या. सलामीवीर हर्षित समरविक्रमाने (२६) संघाच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, तिलाही मोठी खेळी करता आली नाही. यानंतर हसिनी पेरेरा (३० धावा) वगळता इतर श्रीलंकन फलंदाजांचा भारतीय गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही. अखेर श्रीलंकेचा डाव १८.२ षटकांत १०९ धावांवर आटोपला. भारताकडून दयालन हेमलता (१५ धावांत ३ बळी), दीप्ती शर्मा (१५ धावांत २ बळी) आणि पूजा वस्त्रकार (१२ धावांत २ बळी) यांनी प्रभावी मारा केला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताचीही सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर शफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (६) लवकर माघारी परतल्याने भारतीय संघ अडचणीत होता. यानंतर दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या जेमिमाने संघाचा डाव सावरला. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने (३० चेंडूंत ३३ धावा) तिसऱ्या गडय़ासाठी ९२ धावांची निर्णायक भागीदारी रचत भारताला सुस्थितीत पोहोचवले. हरमनप्रीत बाद झाल्यानंतरही जेमिमाने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. जेमिमाने आपल्या खेळीत ७६ धावांच्या खेळीत ११ चौकार व एक षटकार लगावला. त्यामुळे भारताला २० षटकांत ६ बाद १५० अशी धावसंख्या उभारता आली. श्रीलंकेकडून ओशादी रणसिंघेने (३/३२) गोलंदाजीत चमक दाखवली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ६ बाद १५० (जेमिमा रॉड्रिग्ज ७६, हरमनप्रीत कौर ३३; ओशादी रणसिंघे ३/३२) विजयी वि. श्रीलंका : १८.२ षटकांत सर्वबाद १०९ (हसिनी पेरेरा ३०, हर्षिता समरविक्रमा २६; दयालन हेमलता ३/१५, पूजा वस्त्रकार २/१२)

सामनावीर : जेमिमा रॉड्रिग्ज

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : ऐश्वर्या मिश्राची विक्रमासह सुवर्णकमाई

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी संघावर केला खळबळजनक आरोप
IND vs NZ 2nd ODI: करो या मरो! मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक, कशी असेल प्लेईंग ११ जाणून घ्या
विश्लेषण: फुटबॉलमधील युरोप, दक्षिण अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देणारे आशियाई युग अवतरले का?
विश्लेषण: फुटबॉलमध्ये ‘ऑफसाइड’ म्हणजे काय? २०२२ ‘फिफा’ विश्वचषकात कोणते तंत्रज्ञान वादग्रस्त ठरत आहे?
IND vs NZ: मायकल वॉनने धवन-लक्ष्मणच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘टीम इंडिया जुन्या….!’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Gujarat Election 2022: अहमदाबादमधून अमित शाह नावाच्या व्यक्तीला भाजपाकडून उमेदवारी
वादग्रस्त ट्वीटप्रकरणी रिचा चड्ढाविरुद्ध कारवाईची तयारी; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांकडून माहिती
‘म्हाडा’ची ४६७८ घरांसाठी पुढील आठवडय़ात सोडत 
कर्तव्यपालनास प्राधान्य द्या!; संविधानदिनी पंतप्रधान मोदींचे आवाहन
Shraddha Walker murder case: पोलिसांना डीएनए चाचणी अहवालाची प्रतीक्षा