Asia Cup Rising Stars 2025, India vs Pakistan Live Streaming Details: एशिया कप रायजिंग स्टार्स कप २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यात विक्रमी धावसंख्या उभारून एकतर्फी विजयाची नोंद केली. आता भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघांनी साखळी फेरीतील १-१ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेत आणखी वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. दरम्यान हा हाय व्होल्टेज सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या.
भारत – पाकिस्तान सामना केव्हा खेळवला जाईल?
भारत अ आणि पाकिस्तान अ या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना आज (१६ नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे. हा रायजिंग स्टार्स एशिया कप २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील सहावा सामना असणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होईल?
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात होणारा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजे ७:३० वाजता होणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात होणारा सामना दोहा येथील वेस्ट अँड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. इथे तुम्ही इंग्रजी आणि हिंदी समालोचनाचा आनंद घेऊ शकता. यासह तुम्ही हा सामना सोनी लिव ॲपवर लाईव्ह पाहू शकता.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११:
वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार), नेहाल वढेरा, रमनदीप सिंग, यश ठाकुर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा,आशुतोष शर्मा, हर्ष दुबे.
या सामन्यासाठी अशी असू शकते पाकिस्तानची प्लेइंग ११:
मोहम्मद नईम, माज सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, मोहम्मद सलमान, अहमद दानियाल, गाजी घोरी, मुबाशिर, उबेद शाह.
