scorecardresearch

Premium

IND vs AFG T20 Final Highlights: हांगझोऊमध्ये पावसामुळे फायनल सामना झाला रद्द, भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर कोरले नाव

Asian Games 2023 T20 Final Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. पावसामुळे शनिवारी (७ ऑक्टोबर) फायनल सामना रद्द करण्यात आला.

Asian Gmaes 2023 IND vs AFG T20 Final Highlights
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर कोरले नाव (फोटो-ट्विटर)

India vs Afghanistan T20 Final Highlights, Asian Games 2023: चीनमधील हांगझोऊ येथे होत असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला. त्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा सुवर्णपदकाचा सामना पावसामुळे रद्द झाला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे भारतीय क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
rohan bopanna matthew ebden
रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी विजेता; ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीत अजिंक्य
Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh
Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार
india to play match against Syria in asia cup football
भारताला विजय अनिवार्य; आशिया चषक फुटबॉलमध्ये आज सीरियाशी सामना
Live Updates

Asian games 2023 India vs afghanistan T20 final Highlights : आशियाई खेळ 2023 भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० फायनल अपडेट्स

14:45 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: आयसीसीच्या चांगल्या रँकिंगच्या जोरावर भारतीय संघाने जिंकले सुवर्ण पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले आहे. पावसामुळे शनिवारी (७ ऑक्टोबर) सामना रद्द करण्यात आला. भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा अफगाणिस्तानने १८.२ षटकात ५ गडी गमावून ११२ धावा केल्या होत्या. त्यानंतर हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच एशियाडमध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी २०१० मध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते, तर २०१४ मध्ये श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवून सुवर्णपदक जिंकले होते. अफगाणिस्तानचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

https://twitter.com/BCCI/status/1710585015866966087

अफगाणिस्तानच्या डावाबद्दल बोलायचे झाले, तर शाहिदुल्ला कमालने सर्वाधिक नाबाद ४९ धावा केल्या. कर्णधार गुलबदिन नायब २७ धावा करून नाबाद राहिला. अफसर जझाईने १५ धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. जुबैद अकबरी पाच धावा करून बाद झाला, तर मोहम्मद शहजाद चार धावा करून बाद झाला. नूर अली झद्रान आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक धाव काढली. भारताकडून अर्शदीप सिंग, शिवम दुबे, शाहबाज नदीम आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

14:32 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस सुरुच

हांगझोऊमध्ये मध्ये पावसाबद्दल कोणतीही चांगली बातमी नाही. पाऊस सतत पडत असल्याने सामना सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता अंपायर्स काय निर्णय घेतात, याची उत्सुकता लागली आहे.

https://twitter.com/abhaysingh_13/status/1710580313435332860

14:07 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस सुरुच

हांगझोऊमध्ये अजूनही पाऊस पडत आहे. मैदानावर कव्हर्स पसरवले आहे. जर पाऊस थांबला नाही आणि सामना पूर्ण झाला नाही, तर टीम इंडियाला अधिक चांगल्या टी-२० मधील आयसीसी रँकिंगमुळे सुवर्णपदक मिळेल.

https://twitter.com/CricWatcher11/status/1710564808117125279

13:29 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: अफगाणिस्तान संघाची धावसंख्या ११० धावांच्या पार, पावसामुळे खेळ थांबला

अफगाणिस्तान संघाची धावसंख्या ११० धावांच्या पार पोहोचली आहे. शाहिदुल्ला आणि गुलबदिन यांनी सहाव्या विकेट्साठी अर्धशतकी भागीदारी रचली आहे. १८.२ षटकानंतर अफगाणिस्तानची संघाची धावसंख्या ११२ धावांवर ५ विकेट्स अशी आहे. यानंतर पाऊस आल्याने खेळ थांबवण्यात आला आहे.

https://twitter.com/Sbettingmarkets/status/1710565215795126348

12:58 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: शाहबाज अहमदने जानतला केले क्लीन बोल्ड

रवी बिश्नोईने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने १०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अफसर झाझाईला क्लीन बोल्ड केले. अफशरने २० चेंडूत १५ धावा केल्या. अफगाणिस्तानने १० षटकांत ४ गडी गमावून ५० धावा केल्या होत्या. शाहबाज अहमदने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्याने ११व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर करीम जानतला क्लीन बोल्ड केले. जनातने पाच चेंडूत एक धाव घेतली. अफगाणिस्तानने १३ षटकांत सात विकेट गमावत ७० धावा केल्या आहेत. शाहिदुल्ला कमाल ३६ आणि गुलबदिन नायब चार धावांवर नाबाद आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1710553598051115156

12:20 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: भारताला मिळाली तिसरी विकेट, अफगाणिस्तानच्या झुबैद आणि शहजादनंतर नूर अली बाद

अर्शदीप सिंगने अफगाणिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने मोहम्मद शहजादला यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद केले. शहजादने सहा चेंडूत चार धावा केल्या. अफगाणिस्तानने तीन षटकांत दोन गडी बाद १० धावा केल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानला तिसरा धक्का नूर अली जद्रानच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नूर अली धावबाद झाला. त्याने चार चेंडूत एक धाव घेतली.

https://twitter.com/BCCI/status/1710545180817023211

12:04 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: अफगाणिस्तानला बसला पहिला धक्का

शिवम दुबेने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने झुबैद अकबरीला बाद केले. झुबैदने आठ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने पाच धावा केल्या. अर्शदीप सिंगने त्याचा झेल घेतला. अफगाणिस्तानने दोन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात पाच धावा केल्या आहेत. मोहम्मद शेहजाद आणि नूर अली झद्रान क्रीजवर आहेत.

11:50 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): झुबैद अकबरी, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदीन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग.

11:43 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

https://twitter.com/BCCI/status/1710537838570397979

11:36 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: ओल्या मैदानामुळे नाणेफेकीसाठी विलंब

ओल्या मैदानामुळे भारत आणि अफगाणिस्तान सामन्यात नाणेफेक अद्याप झालेली नाही. येथेच बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात कांस्यपदकाची लढत झाली. बांगलादेशने तो सामना जिंकला होता. सामना संपल्यानंतर पाऊस आल्याने मैदान ओले झाले. मात्र, आता कव्हर्स काढण्यात आले असून, मैदान कोरडे करण्याचे काम सुरू आहे. काही वेळाने टॉस होऊ शकतो.

11:13 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा पराभव केला. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध विजय मिळाला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची नजर विजयाची हॅट्ट्रिककडे आहे. असे झाल्यास भारत सुवर्णपदक जिंकेल.

10:48 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: भारत आणि अफगाणिस्तानचा संघ

अफगाणिस्तान टी२० संघ: सैदीकुल्लाह अटल, मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली जद्रान, शाहिदुल्ला कमाल, अफसर झझाई, करीम जनात, गुलबदिन नायब (कर्णधार), शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, झहीर खान, सय्यद शिरजाद, निजात मसूद , जुबैद अकबरी, वफीउल्ला तरखिल.

भारतीय टी२० संघ : यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शदीप सिंग, राहुल त्रिपाठी, अवेश खान मुकेश कुमार, प्रभसिमरन सिंग, आकाश दीप.

10:46 (IST) 7 Oct 2023
IND vs AFG Final: सुवर्णपदकासाठी भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे

भारतीय क्रिकेट संघ आज सुवर्णपदकासाठी अफगाणिस्तानशी भिडणार आहे. भारत सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे.

Asian Games Final IND vs AFG Live Updates

Asian games 2023 India vs afghanistan T20 final Highlights: आशियाई खेळ 2023 भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० फायनल अपडेट्स

Asian Games 2023 T20 Final Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. पावसामुळे शनिवारी (७ ऑक्टोबर) फायनल सामना रद्द करण्यात आला.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Asian games 2023 india vs afghanistan t20 final live updates in marathi vbm

First published on: 07-10-2023 at 10:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×