सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी भारताला आणखी एक पदक मिळवून दिले आहे. जितु राय, समरेश जंग आणि प्रकाश नान्जप्पा यांनी १० मीटर एयर पिस्तुल सांघिक प्रकारात भारतासाठी ब्राँझपदक पटकवण्याची कामगिरी केली. भारताने १७४३ गुणांसह तिसरे स्थान मिळवले तर १७४४ गुणांसह दक्षिण कोरियाने स्पर्धेत सुवर्ण पदक आणि चीनने रौप्यपदक पटकावले.
जितू रायने सांघिक प्रकारात ५८५ गुण मिळवले, तर समरेश जंग आणि प्रकाश नांजप्पा यांनी अनुक्रमे ५८० आणि ५७८ गुण मिळवले. यासोबतच जितू रायने आतापर्यंत या स्पर्धेत दोन वैयक्तिक पदके मिळवली आहेत. याआधी त्याने ५० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2014 रोजी प्रकाशित
आशियाई क्रीडा स्पर्धाः नेमबाजीत भारताला तिसरे पदक
सतराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजांनी भारताला आणखी एक पदक मिळवून दिले आहे.

First published on: 21-09-2014 at 10:12 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian games indian mens team win bronze in 10m air pistol event