ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने नवा विक्रम आपल्या नावे केला. सामन्याच्या चौथ्या दिवशी, सोमवारी टेलर कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सामन्यात फलंदाजी करताना टेलरने न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग याला मागे टाकले.
ROSS TAYLOR ➞ 7174*
Stephen Fleming ➞ 7172
Brendon McCullum ➞ 6453
Kane Williamson ➞ 6379
Martin Crowe ➞ 5444Taylor is now New Zealand’s highest run-scorer in Tests! #AUSvNZ | @BLACKCAPS pic.twitter.com/8qxmjFIXaQ
— ICC (@ICC) January 6, 2020
गांगुलीवर माझा विश्वास, तो ‘असं’ होऊच देणार नाही – शोएब अख्तर
आपली १०० वी कसोटी खेळत असलेल्या टेलरने दुसर्या डावाच्या १८ व्या षटकात न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कसोटी फलंदाज ठरण्याचा बहुमान पटकावला. त्याने स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकले. फ्लेमिंगने १११ कसोटी सामन्यांमध्ये ४०.०६ च्या सरासरीने ७ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ७१७२ धावा केल्या होत्या. टेलरने आजच्या सामन्यात ४२ चेंडूत २२ धावा केल्या. त्यासह टेलरने कसोटी कारकिर्दीत ४६ च्या सरासरीने ७१७४ धावा केल्या आणि फ्लेमिंगला ‘ओव्हरटेक’ केले. टेलरने १०० सामन्यात १९ कसोटी शतके आणि ३३ अर्धशतके केली आहेत. पण हा विक्रम केल्यावर लगेचच १९ व्या षटकात पॅट कमिन्सने त्याला माघारी धाडले.
IND vs SL : जेव्हा अख्खं स्टेडियम एकत्र ‘वंदे मातरम’चा जयघोष करतं…
न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावांच्या यादीत माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम ६,४५३ धावांसह तिसर्या स्थानावर आहे. कर्णधार केन विल्यमसन ६,३७९ धावांसह चौथ्या क्रमांकावर आणि मार्टिन क्रो ५,४४४ धावांसह पाचव्या स्थानी आहे.