Guard of Honor to David Warner : जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाजांपैकी एक डेव्हिड वॉर्नर सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यानंतर वॉर्नर पांढऱ्या जर्सीत ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसणार नाही. त्यामुळे या सामन्यात डेव्हिड वार्नर फलंदाजी आला, तेव्हा पाकिस्तानचे सर्व खेळाडू दोन रांगेत उभे राहिले आणि त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. या प्रसंगाचा व्हिडीओ क्रिकेट डॉट कॉम एयूने एक्सवर शेअर केला आहे.

सिडनी कसोटी सामन्यापूर्वी, १ जानेवारी रोजी, वॉर्नरने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली होती, मात्र, तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सुरू ठेवेल. सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा पाकिस्तान संघाचा कर्णधार शान मसूदने त्याला आदर दाखवला आणि त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला.

डेव्हिड वॉर्नरला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला –

सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानचा संघ ३१३ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने पुन्हा एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. ज्यामुळे पाकिस्तान संघाचा पहिला डाव ३१३ धावांवर आटोपला. यानंतर ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा सलामीसाठी मैदानात आले. या वेळी ख्वाजाने वॉर्नरला मिठी मारून अभिनंदन केले, तर वॉर्नर आपल्या सुप्रसिद्ध शैलीत फलंदाजीसाठी क्रीझकडे गेला. यावेळी पाकिस्तानचे सर्व खेळाडू दोन रांगेत उभे राहिले आणि वॉर्नरला गार्ड ऑफ ऑनर देताना सर्व पाकिस्तानी खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. यानंतर डेव्हिड वार्नरने ही त्यांचे आभार मानले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा डेव्हिड वार्नर सहा चेंडूत सहा धावांवर नाबाद होता.

हेही वाचा – IND vs SA 2nd Test : केपटाऊनमध्ये सिराज-बुमराहने दिला आफ्रिकेला दणका! यजमानांनी अवघ्या १५ धावांत गमावल्या चार विकेट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा कांगारूंच्या गोलंदाजीसमोर ढेपाळताना दिसला. या संघाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक आणि सैम अयुब शून्यावर बाद झाले. यानंतर कर्णधार शान मसूदने ३५ धावांची खेळी केली. या सामन्यातही बाबर आझमने निराशा केली. तो २६ धावा आणि सौद शकीलने ५ धावा काढून बाद झाले. पहिल्या पाच फलंदाजांची कामगिरी फारशी चांगली नव्हती, पण यानंतर मोहम्मद. रिझवानच्या ८८ धावा, आगा सलमानच्या ५३ धावा आणि त्यानंतर आमेर जमालच्या ८२ धावांच्या जलद खेळीच्या जोरावर संघाची धावसंख्या ३१३ धावांपर्यंत पोहोचली.