Champions Trophy AUS vs SA Match Abondoned Due To Rain: चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका पावसामुळे रद्द झाला आहे. रावळपिंडीमध्ये हा सामना खेळवला जात होता, पण सुरूवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि नाणेफेक न होताच सामना रद्द करण्यात आला. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात आला आहे. पण याचा गुणतालिकेवर काय परिणाम होणार, जाणून घेऊया.

Quiz code is –

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचा सामना रद्द झाल्याने आता ब गटातील लढत अधिक चुरशीची झाली आहे. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना आता खूप महत्त्वाचा असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील ब गटाच्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ समान ३ गुणांवर आहेत.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरूद्धचा पहिला सामना ५ विकेट्सने आणि १५ चेंडू शिल्लक ठेवत जिंकला. तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरूद्धचा पहिला सामना १०७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. यासह नेट रन रेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ वरचढ आहे. दोन्ही संघ गुणांवर बरोबरीत असूनही, दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत जास्त रन रेटसह पहिल्या स्थानी असेल. दक्षिण आफ्रिकेचा रन रेट हा +२.१४० आहे , तर ऑस्ट्रेलियाचा रन रेट +०.४७५ आहे.

Champions Trophy 2025 B Group Time Table
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटाची गुणतालिका

इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकत सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा एकेक सामना शिल्लक आहे. त्यामुळे या चारही संघांचे सर्व सामने जोपर्यंत पूर्ण होत नाहीत. तोवर सेमीफायनलचे तिकीट कोणाला मिळणार याबाबत निश्चितता नाही. पण नेट रन रेट पाहता दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पुढचा सामना जिंकल्यास त्यांना सेमीफायनल गाठता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर चॅम्पियन्स ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाचं नशीब खराब असल्याचं दिसत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठ सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला चौथ्यांदा पावसामुळे सामना अनिर्णित सुटण्याचा आणि रद्द होण्याचा धक्का बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील ही चौथी वेळ जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाचा सामना रद्द झाला आहे.