ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन मातब्बर संघांमधील मुकाबला आणखी रंगतदार झाला आहे. शेरास सव्वाशेर कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अद्यापही विजयाची प्रतीक्षा आहे. पर्थ कसोटीत विजय मिळवत क्रमवारीतील अव्वल स्थान पटकावण्यासाठी दोन्ही संघ आतूर आहेत.
पर्थमध्ये कसोटीत विजय मिळाल्यास किंवा कसोटी अनिर्णीत झाल्यास आफ्रिका आपले अव्वल स्थान कायम राखू शकते तर ऑस्ट्रेलियाचा संघ या कसोटीत विजयासह तीन वर्षांनंतर अव्वल स्थानी विराजमान होऊ शकतो. आफ्रिकेचा आधारस्तंभ आणि अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस दुखापतीमुळे पर्थ कसोटीत खेळू शकणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या संघातही बदल अपेक्षित आहेत. वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिन्सन दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. पीटर सिडलच्या खेळण्याविषयी साशंकता आहे. मिचेल जॉन्सन, जेश हॅझलवूड आणि जॉन हेस्टिंग्स यांना संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Nov 2012 रोजी प्रकाशित
कसोटी अव्वल स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत झुंज
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन मातब्बर संघांमधील मुकाबला आणखी रंगतदार झाला आहे. शेरास सव्वाशेर कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अद्यापही विजयाची प्रतीक्षा आहे. पर्थ कसोटीत विजय मिळवत क्रमवारीतील अव्वल स्थान पटकावण्यासाठी दोन्ही संघ आतूर आहेत.
First published on: 29-11-2012 at 04:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia and africa will fight for topper in test cricket