ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ९१ धावांनी धुव्वा उडवत महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत धडाकेबाज प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४६.१ षटकांत सर्वबाद १७५ धावा केल्या. त्यामध्ये रॅचेल हेन्स (३९) व सराह कॉयटे (नाबाद ३५) यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर सराह ३/२०), होली फर्लिग (२/१०) व लिसा स्थळेकर (२/१९) यांच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचा डाव केवळ ८४ धावांमध्ये कोसळला. पाकिस्तानकडून बिस्माह मारुफ हिने ४३ धावा करीत एकाकी लढत दिली.
संक्षिप्त निकाल
ऑस्ट्रेलिया : ४६.१ षटकांत सर्वबाद १७५ (रॅचेल हेन्स ३९, सराह कॉयटे नाबाद ३५, लिसा स्थळेकर ३२; सादिया युसुफ ३/३०, अस्माविया इक्बाल २/३६) विजयी वि. पाकिस्तान : ३३.२ षटकांत सर्वबाद ८४ (बिस्माह मारुफ ४३; सराह कॉयटे ३/२०, होली फर्लिग २/१०, लिसा स्थळेकर २/१९)