ऑस्ट्रेलियाने अखेरच्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करत अॅशेस मालिका ५-० अशी जिंकत इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे. पाचव्या कसोटीच्या तिस-याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश लोटांगण घातले आणि सामन्याच्या तिस-याच दिवशी ऑस्ट्रेलियाने २८१ धावांनी विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी ४४८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकल्याने इंग्लंडचा डाव अवघ्या १६६ धावांत संपुष्टात आला आणि पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामनाही जिंकत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ‘व्हाईटवॉश’ दिला. ऑस्ट्रेलियातर्फे हॅरिसनने ५, जॉन्सनने ३ व लियॉनने २ बळी टिपले. हॅरिसला मॅन ऑफ दि मॅच तर जॉन्सनला मॅन ऑफ दि सीरिजचा खिताब देण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला दिला व्हाईटवॉश
ऑस्ट्रेलियाने अखेरच्या कसोटीत इंग्लंडचा पराभव करत अॅशेस मालिका ५-० अशी जिंकत इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे.

First published on: 05-01-2014 at 12:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia crush england to seal 5 0 ashes sweep