महिला आणि लहान मुलांना दिल्या जात असणाऱ्या वागणुकीप्रति नाराजी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा अफगाणिस्तानविरूध्दचा दौरा पुढे ढकलला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात ही टी-२० मालिका ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवली जाणार होती. सप्टेंबर २०२१ मध्ये तालिबानने राज्यावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये खेळात महिलांच्या सहभागावर निर्बंध आणले आहेत.

“ऑस्ट्रेलियन सरकारशी चर्चा केल्यानंतर, अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांमध्ये घट झाल्यामुळे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये नियोजित अफगाणिस्तान विरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलली होती. देशातील महिला आणि मुलींसंबंधित ही परिस्थिती सुधारेल, या अपेक्षेने आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी जोडलेले राहू. असे सीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

“गेल्या बारा महिन्यांत, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानमधील परिस्थितीबद्दल ऑस्ट्रेलियन सरकारशी चर्चा केली. सरकारचा सल्ला आहे की अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींना दिली जात असणारी वागणूक अधिक तीव्र होत चालली आहे. या कारणास्तव, आम्ही पूर्वी घेतलेला निर्णय कायम ठेवला आणि अफगाणिस्तानविरुद्धची द्विपक्षीय मालिका पुढे ढकलत आहोत,” असे त्यात म्हटले आहे.

जानेवारी २०२३ मध्ये, ऑस्ट्रेलियाने याच समस्यांमुळे मार्चमध्ये होणारी अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका पुढे ढकलली होती. सीएने तेव्हा स्पष्ट केले होते की,”महिला आणि मुलींच्या शिक्षण आणि रोजगारावरील निर्बंधांबाबत तालिबानच्या अलीकडील घोषणेनंतर हा निर्णय घेण्यात आला.”

२०२१ मध् सर्वात आधी कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसोबत तिसरा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. यानंतर त्यांनी एकदिवसीय मालिकाही खेळण्यास नकार दिला. २०२१ मध्ये, एकदिवसीय मालिका अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाद्वारे आयोजित केली जाणार होती आणि या मालिकेचे सामने युएईमध्ये खेळवले जाणार होते. ॉ ही मालिका रद्द झाल्यानंतर अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खान ऑस्ट्रेलियन क्रिकेटवर खूप नाराज होता.

राशिद खान ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध टी-२० लीग बिग बॅश लीगमधील संघाचा भाग आहे. २०२१ मध्ये एकदिवसीय मालिका रद्द झाल्यानंतर राशिद खान म्हणाला होता की, “ऑस्ट्रेलियाने मालिका खेळण्यापासून माघार घेतल्याचे ऐकून मी खरोखर निराश झालो आहे. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना मला खूप अभिमान वाटतो आणि आम्ही जागतिक स्तरावर खूप प्रगती केली आहे. सीएचा हा निर्णय या प्रवासातील आमच्यासाठी सेटबॅक आहे. अफगाणिस्तान विरुद्ध खेळणे ऑस्ट्रेलियासाठी इतके अस्वस्थ करणारे असेल, तर बीबीएलमधील माझ्या उपस्थितीमुळे मी कोणालाही अस्वस्थ करू इच्छित नाही. त्यामुळे या स्पर्धेत भविष्यात खेळण्याबाबत मी ठामपणे विचार करेन.”

२०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या साखळी टप्प्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात शेवटचा सामना झाला होता. या सामन्यात अफगाण संघाने आपल्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला तगडी टक्कर दिली. २९२ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ७ बाद ९१ धावा केल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद २०१ धावांच्या जोरावर संघाने विजय मिळवला.