ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क शुक्रवारी एलिसा हिली हिच्याबरोबर विवाहबंधनात अडकला. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघातील यष्टीरक्षक आहे. मिचेल आणि एलिसा यांचा विवाहसोहळा खासगी पद्धतीने पार पडला. या विवाहसोहळ्याला ऑस्ट्रेलियन संघातील नॅथन लायन, जोश हॅझलवूड आणि पॅट कमिन्स हे सहकारी उपस्थित होते.
दुखापतीमुळे यंदा स्टार्क टी-२० विश्वचषकात खेळू शकला नव्हता. याशिवाय यंदा आयपीएलमध्येही तो सहभागी झालेला नाही. दुसरीकडे एलिसी हिलीने यंदा महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेट हे एलिसाच्या रक्तातच आहे. तीचे वडील ग्रेग ऑस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते, तर ऑस्ट्रेलियाचे महान यष्टीरक्षक इयन हिली हे एलिसाचे चुलते आहेत. एलिसा आणि मिचेल हे दोघेजण नऊ वर्षांचे असताना एका क्रिकेटस्पर्धेत एकमेकांना भेटले होते. या दोघांनी ११ वर्षांखालील संघात यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यानंतर तब्बल सहा वर्षे हे दोघेजण एकत्र खेळत होते. यादरम्यान मिचेल आणि एलिसामध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mine! #stealy @a_healy

A photo posted by @mstarc56 on

Double trouble. Stealy and Poomua. #itsofficial #stealywedding

A photo posted by Ellyse Perry (@ellyseperry) on

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian fast bowler mitchell starc and southern stars wicketkeeper alyssa healy have married in sydney
First published on: 15-04-2016 at 19:16 IST