एक लाल मातीचा राजा आणि दुसरा टेनिसचा सुपरस्टार..आधुनिक टेनिसचे शिलेदार असणारे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल नदाल ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत समोरासमोर उभे ठाकणार आहेत.
१७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेला फेडरर पाच वर्षांनंतर जेतेपद पटकावण्यासाठी आतूर आहे, तर राफेल नदाल १५वे ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर करण्यासाठी सज्ज आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेला अव्वल मानांकित अँडी मरे आणि नोव्हाक जोकोव्हिच यांचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे फेडरर -नदाल यांच्यात महामुकाबला होण्याची शक्यता निर्माण झाली. दुखापतीमुळे हालचालींवर आलेल्या मर्यादा, युवा खेळाडूंची ऊर्जा यांना पुरेपूर टक्कर देत फेडरर आणि नदाल यांनी अंतिम फेरी गाठली. कदाचित हे दोघंही यापुढे ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळताना पाहायला मिळतील, याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे या दोन अव्वल दर्जाच्या टेनिसपटूंचा सामना याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण जग आतुर आहे.

नदाल विरुद्ध फेडरर सामना केव्हा?

राफेल नदाल विरुद्ध रॉजन फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना २९ जानेवारी रोजी होणार आहे.

सामना कुठे खेळवला जाणार?

फेडरर विरुद्ध नदाल सामना ऑस्ट्रेलियाच्या रोड लावेर अरेना या मेलबर्न येथील कोर्टवर होणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

टेलिव्हिजनवर फेडरर विरुद्ध नदाल सामना सोनी सिक्स या वाहिनीवर पाहता येणार आहे. ‘सोनी सिक्स एचडी’वरही सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

सामन्याची वेळ-

फेडरर विरुद्ध नदाल सामन्याचे प्रक्षेपण दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होईल.

सामन्याचे लाइव्ह अपडेट्स कुठे?

फेडरर विरुद्ध नदाल सामन्याचे लाइव्ह अपडेट्स indianexpress-loksatta.go-vip.net वर पाहता येतील.