ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कर्मचाऱ्याशी वाद झाला आहे. ऑस्ट्रेलिया बोर्डाच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओवरून हा वाद झाला. या व्हिडिओमध्ये बांगलादेशचे खेळाडू गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्यांच्या पहिल्या मालिका विजयाचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ नुसार, क्रिकेट डॉट कॉम वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवरून मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर लँगर आणि ऑस्ट्रेलिया संघाचे व्यवस्थापक गेविन डोवी यांच्यात वाद झाला. यजमान बांगलादेशने पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ने जिंकली.

अहवालानुसार, डोवीने सुरुवातीला हे प्रकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (सीए) डिजिटल कर्मचाऱ्यांकडे नेले, पण जेव्हा ते सहमत झाले नाही, तेव्हा हे प्रकरण वाढले आणि लॅंगर स्टाफ मेंबरवर चिडले. सीएच्या वेबसाइटवर बांगलादेश संघाचे गाणे पोस्ट करणे अयोग्य आहे. काही खेळाडू या गोष्टीशी सहमत नव्हते.

 

लँगर यांनी या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला, परंतु डोवी म्हणाले, “निरोगी सांघिक वातावरणात प्रामाणिक आणि स्पष्ट चर्चा समाविष्ट असते. मग ते खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा संघाशी संबंधित इतर लोकांमध्ये असो, जसे या प्रकरणात घडले. येथे मतभेद होते आणि आम्ही एखाद्या विषयावर असहमत होतो. मात्र, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडू नये. मी याची पूर्ण जबाबदारी घेतो.”

हेही वाचा – IND vs ENG : ‘दादा’चं लॉर्ड्स कनेक्शन..! ‘तो’ फोटो शेअर करत इंग्लंडच्या जखमेवर चोळलं मीठ

सीएचे बांगलादेशमध्ये दोन डिजिटल मीडिया ऑपरेटर होते. पाचव्या आणि शेवटच्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाने नीचांकी धावसंख्या नोंदवली. बांगलादेशने ६० धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत १-४ने पराभव स्वीकारला होता. ऑस्ट्रेलियाने आता सलग पाच टी-२० मालिका गमावल्या आहेत. त्यांनी २१ पैकी फक्त सहा सामने जिंकले आहेत.