भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत शर्ट काढून नाचणारा इंग्लंडचा सलामीवीर गॅरी बॅलन्सला संघाचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांनी ताकीद दिली आहे. इंग्लंडमधील वर्तमानपत्रांमध्ये गॅरीचे छायाचित्र छापून आल्यावर इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने याची दखल घेतली; पण त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून प्रशिक्षक मूर्स यांनी त्याला ताकीद देऊन जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. याबाबत मूर्स म्हणाले की, ‘‘पहिल्या कसोटी सामन्यानंतर खेळाडूंना मोकळीक देण्यात आली होती. त्या वेळी हा प्रकार घडला असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाईची गरज नाही.’’